पूर्ण नाम दशक विसावं समास पहिला पूर्णापूर्ण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. प्राणी व्यापक आहे, मन व्यापक आहे. पृथ्वी, आप, तेज व्यापक आहे. वायू, आकाश, त्रिगुण व्यापक आहे. अंतरात्मा, मूळ माया व्यापक आहे. निर्गुण ब्रह्म व्यापक आहे. असं सगळंच व्यापक आहे तर मग हे व्यापकपण एक सारखच आहे का? की त्याच्यामध्ये काही भेद आहेत? आत्मा आणि निरंजन इथेही अनुमान केलं जातं. आत्मा सगुण की निर्गुण? आणि निरंजन? श्रोता संशयात पडला त्यामुळे संशय वाढला. अनुमान धरून बसला. असा कसा बसला तो अशी शंका आली आता तुम्ही गडबड करू नका.
विवेक प्रगट करून अनुभव पहा. शरीरानुसार सामर्थ्यानुसार प्राणी व्याप करतो, पण मनाएवढं चपळ दुसरे काही नाही. मनाचं हे चपळपण आहे हे परिपूर्ण नाही, कारण ते एका वेळी एकाच विषयाचा अंगीकार करते. हे चपळपण एकदेशी आहे, पूर्ण व्यापकता त्याला नाही. पृथ्वीचा व्याप आहे, त्यालाही सीमा आहेत. त्याचप्रमाणे आप आणि तेज हे देखील अपूर्ण आहे. ते सहज दिसत. वायूच्या चपळ आहे असा समज आहे, पण तो सुद्धा एकदेशी आहे त्याला मर्यादा आहेत.
गगन आणि निरंजन हे पूर्ण व्यापक आणि सघन आहे असं म्हणतात असा अंदाज केला होतो पण तेही तसं नाही. त्रिगुण गुणक्षोभिणी माया असं म्हटलं जातं. माईक आहे ते सगळं विलयाला जाईल, नष्ट होईल. त्यामुळे हे सगळं अपूर्ण आहे आणि एकावेळी एकाच स्थानी नसतं. त्याला पूर्ण व्यापकपण नसतं. आत्मा आणि निरंजन हे दोन्हीकडे नामाभिधान दिलं जातं. आत्मा आणि निरंजन या शब्दाचा प्रयोग ज्या संदर्भात असेल तसा अर्थ करावा. दोन्ही नावं पर्यायी आहेत.
आत्मा म्हणजे अंतरात्मा. मन अत्यंत चपळ आहे, तरी पण ते व्यापक नाही. केवळ शुद्ध अंतकरण करून पहावं म्हणजे समजेल. अंतराळात पाहिलं तर ते पाताळात नाही, पाताळात पाहिलं ते अंतराळात नाही. पूर्णपणे सगळीकडे असत नाही. पुढे पाहिलं तर मागे पाहता येत नाही मागे पाहिलं तर पुढे पाहता येत नाही. डावीकडे पाहिलं तर उजवीकडे पाहता येत नाही. दहा दिशांकडे व्याप नाही. चारही दिशांना निशाण मांडली तर ती एकाच वेळी कशी दिसतील? यासाठी तो प्रत्यय आपल्याला यायला पाहिजे. सूर्याला उदय आणि अस्त आहेत म्हणून सूर्याचे प्रतिबिंब जसं घटात पडतं तर त्याप्रमाणे परब्रम्हाचं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणे योग्य नव्हे. हा दृष्टांत काही पुरत नाही.
ब्रह्माचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस दोरीचा अनुभव प्रत्ययास येतो तो घ्यावा. आकाशाचा दृष्टांत त्या पेक्षा जास्त बरोबर आहे. योग्य तेवढ्या भागाचा विचार घेतला पाहिजे. नाहीतर आकाश आणि मन हे सारखेच मानावे लागेल मात्र ते तर अशक्य आहे. गगन आणि मन हे समान कसे होतील? मननशील महाजन आहेत ते सगळं जाणतात. मन हे पुढे वावडे आणि सगळे रिते पडते. पूर्ण गगनाशी त्याचे साम्य कशाप्रकारे होईल? परब्रह्मदेखील अचळ आणि पर्वत देखील अचल मात्र दोन्हीही एक हे कसे म्हणता येईल? ज्ञान विपरीत ज्ञान हे समान कसे होतील? याचा अनुभव मनन करून घ्यावा. ज्ञान म्हणजे जाणणं, अज्ञान म्हणजे जाणीव नसणे, विपरीत ज्ञान म्हणजे एका ऐवजी दुसरच काही दिसत. विपरीत ज्ञान म्हणजे भ्रम आहे हे जीवाला समजलं पाहिजे.
द्रष्टा साक्षी अंतरात्मा आहे. जिवात्मा हाच शिवात्मा आहे. पुढे शिवात्माच जीवात्मा म्हणून जन्म घेतो. जोपर्यंत मी आत्मा ही जाणीव आहे तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. ईश्वरालाही ही जाणीव आहे. हे चांचल्य असल्याने त्यालाही अवतार म्हणून प्रत्येक युगात जन्म घ्यावे लागतात. त्यामुळे ‘संभवामि युगे युगे’ असं वचन आहे. त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान हे वृत्तीने समान आहे. त्यांची स्थिती मीपणामुळेच असल्यामुळे जाणीवरुपाने ते दोन्ही सारखेच होत. ‘मी’पणा विरहित अनुभवस्वरूप होणं हेच श्रेयस्कर आहे. ज्ञानाने एवढा ब्रह्मांड केलं, ज्ञानाने एवढं वाढवलं नाना विकारांचं जे वळलेले ते ज्ञान. मूळमाया, एकोहम ही स्फूर्ती हेच ज्ञान. ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून, ते ज्ञानही सोडून मी पण विहिरीत अशा केवल अनुभव स्वरूप स्थितीला पोहोचले पाहिजे. म्हणजे देह ब्रह्मांडीचे ज्ञान हे खरं ज्ञान विज्ञानरूप विदेही पद प्राप्त व्हायला पाहिजे असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पूर्णापूर्ण निरुपण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७