मुंबई – बिग बॉसच्या घरामध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये मीनल शाह, विकास पाटील, संतोष चौधरी (दादुस) आणि आदिश वैद्य हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या चार जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. वाइल्ड कार्ड द्वारे आलेल्या आदिश वैद्यला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
बिग बॉस मराठी सिझन ३ च्या या आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये आले बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील दोन लोकप्रिय सदस्य ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन पहिलाची विजेती मेघा धाडे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी रेशम टिपणीस. दोघींनी सदस्यांचे भरभरून कौतुक केले, तर काही सदस्यांना ते कुठे चुकत आहेत ते देखील सांगितले. तसेच सदस्यांसोबत एक मजेदार गेमदेखील खेळल्या. उत्कर्ष आणि सोनाली पाटिलने बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली तर चुगली बूथद्वारे विशालला त्याच्या फॅनने सोनालीबद्दल चुगली केली ज्यामुळे विशाल दुखावला गेला.
महेश मांजरेकर यांनी केलेल्या कानउघडणीचा सदस्यांवर काही परिणाम होणार का ? कोण बनणार नवा कॅप्टन ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.