साडे नऊ तासाच्या चौकशी नंतर खा.संजय राऊत ईडी च्या ताब्यात 

राजकीय सुडाने केलेली हि कारवाई आहे - संजय राऊत (व्हिडीओ पहा)

0

मुंबई – अखेर साडे नऊ तासाच्या चौकशी नंतर खा.संजय राऊत यांना  ईडी ने ताब्यात घेतले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज सकाळी ७ वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं. त्यानंतर तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने दुपारी साडे तीनच्या सुमारास संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. आता संजय राऊत यांना घेऊन  ईडीची टीम कार्यालयात घेऊन निघाली आहे.मात्र, संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय ? असा प्रश्न विचारला जातोय.

तत्पूर्वी संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राऊतांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला.संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्या नंतर घरा बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दुसरीकडे मुंबईतील ईडीच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऑफिसबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.

संजय राऊत यांना अद्याप अटक केली नसून त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यत घेतले असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.

राजकीय सुडाने केलेली हि कारवाई आहे – संजय राऊत
माझ्या कडे कोणतेही कागदपत्र मिळाले नसून केवळ राजकीय सुडाने केलेली हि कारवाई आहे काही जरी झाले तरी मी झुकणार नाही. पत्राचाळ वगैरे म्हणतायेत कोणता पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे मला माहित नाही ती चाळ कुठे आहे मला माहित नाही .

मी सहा महिन्यापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून माझ्यावरती कसा दबाव आणला जातो हे कळवलं होतं ते सरकार पाडण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे आणि मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न कसा केला जाईल ही सर्व माहिती मी उपराष्ट्रपती व्यंकय नायडू यांना दिली होती आणि भविष्यामध्ये मी आत असेल किंवा बाहेर त्याची मला परवा नाही याही पेक्षा मोठे स्पोर्ट मी करत राहील तेव्हा भारतीय जनता पक्षाला कळेल की लढाई काय आहे माझ्यावरती काही आरोप नाहीयेत आरोप खोटे आहेत महाराष्ट्राने उठून उभा राहावं

संपूर्ण शिवसेना माझ्या पाठीशी आहे. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे  मरेल पण झुकणार नाही, उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावर हि कारवाई आहे.असे संजय राऊत यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.