राज ठाकरेंच्या इशाऱ्या नंतर मनसैनिक आक्रमक,विना टोल गाड्या सोडल्या

कार्यकर्त्यांची धरपकड :राज्यभरात टोलविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे !

0

मुंबई दि. ९ ऑक्टोबर २०२३ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत  घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत.  टोल नाक्यावर उभे राहत चार चाकी वाहने सोडली.तसेच देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून लहान वाहने विना टोल पुढे सोडली. त्यानंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.राज्यात आता टोलविरोधी आंदोलन चांगलंच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत टोलच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. वाहन चालकांना टोल न देण्याचे आवाहन राज यांनी केले. ज्या टोल नाक्यावरून टोल घेतला जाईल, तो टोल नाका पेटवून देण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिकांना टोल नाक्यावर जात वाहने टोलशिवाय सोडण्यास सुरुवात केली.

काय म्हणाले राज ठाकरे ? 
महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी “देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू”

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
जी घोषणा आम्ही टोलमुक्तीची केली होती, त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर छोट्या गाड्यांना त्यांना आम्ही मुक्ती दिली आहे.केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.