अहमदाबाद विमान अपघात: सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू,
वैद्यकीय महाविद्यालयातील २० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचाही मृत्यू?
अहमदाबाद, दि. १२ जून २०२५ –Ahmedabad Plane Crash News अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलायनर ७८७ हे प्रवासी विमान दुपारी १.३१ वाजता टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. AP वृत्तसंस्थेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात विमानातील सर्व २४२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हे विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात असलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले. त्यामुळे महाविद्यालयात उपस्थित असलेल्या सुमारे २० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
विमानातील २४२ प्रवाशांमध्ये –(Ahmedabad Plane Crash News )
१२ क्रू मेंबर्स
२ नवजात बाळं
११ लहान मुले
२१७ प्रौढ प्रवासी
यांचा समावेश होता. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगालचे, आणि १ कॅनडाचा नागरिक होता. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
या घटनेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान रिषी सुनक यांनी ट्विटरवरून दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, क्रू मेंबर्सपैकी २ जण महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या एनडीआरएफ व बचाव पथक घटनास्थळी दाखल असून, बचाव कार्य सुरू आहे. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Air India फ्लाइट AI171 मध्ये प्रवासी व चालकदलासह एकूण २४२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमाय़नातील मृतकांची संपूर्ण नावे सार्वजनिक केली गेली नाहीत,परंतु विमानवाहतूक महानियंत्रण (DGCA) आणि एअर इंडिया यांनी काही प्राथमिक नावं जाहीर केली आहेत. जाहीर झालेल्या नावांमध्ये माजी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे नाव समाविष्ट आहे .
एअर इंडिया आणि प्रशासकीय
Mrs Amin A.
Mr Subhashchandra Amin
Mrs Neha Pramukh Inanda, Mr Pravesh Pramukh Inanda, Mr Prayash Pramukh Inanda
Mrs Babiben Kuberbhai Patel, Mr Dilip Mahendrabhai Patel, इत्यादी
एअर इंडिया अपघात हेल्पलाइन/वेबसाइट: अधिकृत ओळख आणि संपर्कासाठी उघडेलेली सुविधा वापरता येईल (उदा. 1800 5691 444)
An airplane crashed in India’s northwestern city of Ahmedabad in Gujarat state on Thursday, news agency the Press Trust of India reported.
Air India said the crashed aircraft was a passenger flight to London. pic.twitter.com/C6P04JY0AB
— The Associated Press (@AP) June 12, 2025
[…] अहमदाबाद विमान अपघात: सर्व २४२ प्रवाश… […]