केंद्र सरकारचा मोठा निर्णय :बोईंग 787-8/9 विमानांची सक्तीची तपासणी सुरू

उड्डाणपूर्व तपासणी बंधनकारक;बोईंग 787-8/9 विषयी राज ठाकरे यांनी ही उपस्थित केले प्रश्न

0

नवी दिल्ली, दि. १३ जून २०२५ — Ahmedabad plane crash update अहमदाबादमधील विमान दुर्घटनानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने एअर इंडियाच्या बोईंग 787-8 आणि 787-9 ड्रीमलाईनर विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले असून, १५ जून २०२५ पासून भारतातून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक विमानाची तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.

बोईंग ड्रीमलाईनरवर संशयाची सावली
एअर इंडिया वापरत असलेल्या बोईंग 787 मालिकेच्या विमानांबाबत अनेक वर्षांपासून तांत्रिक त्रुटी, आगीची प्रकरणे, उड्डाणातील अडचणी यांसारख्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या दुर्घटनेनंतर बोईंग ड्रीमलाईनर विषयी चिंता व्यक्त करत DGCA व सरकारला प्रश्न विचारले होते.

DGCA चे महत्त्वाचे आदेश:( Ahmedabad plane crash update )

DGCA ने दिलेले निर्देश हे प्रतिबंधात्मक स्वरूपाचे असून खालीलप्रमाणे आहेत:

१५ जूनपासून सर्व उड्डाणपूर्व विमान तपासणी सक्तीची

इंधन प्रणाली आणि संबंधित पॅरामीटर्सची काटेकोर चाचणी

केबिन एअर कंप्रेसर व इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल यंत्रणेची तपासणी

हायड्रॉलिक आणि फ्युएल सिस्टीमची सेवा स्थितीची समीक्षा

टेकऑफ पॅरामीटर्सचा नोंदवहीत उल्लेख

‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ दरम्यान तात्पुरत्या चाचण्या

‘पॉवर अश्युरन्स चेक’ २ आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक

मागील १५ दिवसांतील तांत्रिक बिघाडांचा आढावा आवश्यक

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न:
राज ठाकरे यांनी म्हटले की, “ड्रीमलाईनर विमानाविषयी २०१३ पासूनच जगभरातून तक्रारी येत होत्या. त्या काळात अनेक देशांनी या विमानांचं उड्डाण थांबवलं होतं. भारतानेही काही काळ त्यावर बंदी घातली होती. अशा तक्रारी असूनही आपण ही विमाने ताफ्यात का ठेवली? DGCA ने यावर आधीच कठोर पावले का उचलली नाहीत?”

सरकारकडून कारवाईचे संकेत:
या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने बोईंग 787 मालिकेच्या प्रत्येक विमानावर अतिरिक्त तपासणीचे आदेश देत, एअर इंडियाला तपासणीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, DGCAने एअर इंडियाच्या देखभाल प्रणालीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!