अजित पवारांनी सोशल मीडियावरून वरून ‘राष्ट्रवादी’चे नाव,चिन्ह असलेला वॉलपेपर हटवला

0

मुंबई,दि. १८ एप्रिल २०२३- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे काही आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. त्यामुळे त्यामुळे हे धुके गडद झाले असून पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या बातम्या अफवा असल्याचे सांगत स्वतः अजित पवारांपासून ते शरद पवारांपर्यंत सारेच जण खंडन करत आहेत. मात्र, तसे कृत्य होताना दिसत नाही. कारण अजित पवार यांनी कालचे कार्यक्रम ऐनवेळी रद्द केले. मात्र, असे कार्यक्रम नव्हते, असा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केला. त्यानंतर आता सोशल मीडियावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले वॉलपेपर हटवलेत. त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झाली.

अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो त्यांनी डिलिट केला. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा  सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने अजित पवार हे ४० आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून बी प्लॅन तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांना भाजप धक्का देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत का? अजित पवार हे अस्वस्थ आहे का? असे विविध सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.

Ajit Pawar removed wallpaper with 'Nationalist' name, symbol from social media

अजित पवार यांनी ट्विट करत सांगितले आहे की, सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. मंगळवारी १८ एप्रिलरोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.