अमरनाथ यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:४ दिवसांत ७० हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

0

📍 श्रीनगर, दि. ७ जुलै २०२५ – Amarnath Yatra news अमरनाथ यात्रा २०२५ ला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या चार दिवसांत ७०,००० हून अधिक भाविकांनी बर्फानी बाबांचे दर्शन घेतले आहे. ३ जुलैपासून यात्रा सुरू झाली असून ८ जुलै रोजी पुन्हा एकदा ८,६०५ यात्रेकरूंचा नवीन जत्था काश्मीरच्या दिशेने रवाना झाला आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ रविवारीच २१,५१२ भाविकांनी अमरनाथ गुहेचे दर्शन घेतले. यात्रेकरूंमध्ये महिला, वृद्ध, तरुण आणि लहान मुलांचाही समावेश होता. जम्मूमधील भगवती नगर येथील यात्रीनिवासातून दोन सुरक्षा ताफ्यांमध्ये यात्रेकरूंची रवाना केली जात असून, पहिला ताफा ३,४८६ यात्रेकरूंना घेऊन उत्तरेकडील बालटाल बेस कॅम्पकडे तर दुसरा ताफा ५,११९ यात्रेकरूंना घेऊन दक्षिण काश्मीरच्या नुनवान (पहलगाम) बेस कॅम्पकडे रवाना झाला.

(Amarnath Yatra news) यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूमध्ये नोंदणी करणाऱ्यांबरोबरच अनेक भाविक थेट बालटाल व नुनवान येथे जाऊन नोंदणी करत आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा विचार करता, लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी आणि स्थानिक पोलिस यांच्यासह सीएपीएफच्या १८० अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण मार्ग सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, यंदाच्या अमरनाथ यात्रेला स्थानिक काश्मीरी नागरिकांकडून भरपूर सहकार्य मिळत आहे. पहिल्या जत्थ्याचे स्वागत करताना स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नौगाम बोगदा पार करताच काझीगुंड येथे काश्मीरमध्ये प्रवेश करणाऱ्या यात्रेकरूंना स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टीसह स्वागत केले. रविवारी बालटाल बेस कॅम्पवरून परतणाऱ्या भाविकांना गांदरबल जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांनी कोल्ड ड्रिंक व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले. भाविकांनीही स्थानिकांच्या प्रेमाचा मनापासून स्वीकार करत त्यांचे आभार मानले.

अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू झाली असून ती ३८ दिवस चालेल आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी समाप्त होईल. या यात्रेला हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र यात्रा मानली जाते. अशी श्रद्धा आहे की या गुहेत भगवान शिव यांनी माता पार्वतीला अमरत्वाचा व शाश्वत जीवनाचा रहस्य सांगितले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!