नाशिक,दि.२३ जुलै २०२३ –मनसे नेते अमित ठाकरे गेल्या ५ दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.नंदुरबार ,धुळे नंतर शनिवारी त्यांनी अहमदनगरमधे कार्यकर्त्यांची भेट घेतली.त्यानंतर रात्री उशिरा अमित ठाकरे हे मुंबईच्या दिशेने येत होते. मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोलनाकाच फोडला आहे.
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा टोल नाका मनसे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फोडला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जात असताना गोंदे टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली होती. याच गोष्टीचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी हा टोल नाका फोडला आहे.