गावगुंड पाठवून समीर भुजबळ यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न

नांदगाव, विधानसभा मतदासंघातील आणि मालेगाव तालुक्यात येणाऱ्या साकुर या गावातील घटना

0

नांदगाव,दि.११ नोव्हेंबर २०२४ – नांदगाव विधानसभा मतदारसंघातील पण मालेगाव तालुक्यातील साकूर येथे अपक्ष उमेदवार मा.खासदार समीर भुजबळ यांची सभा काही गावगुंडांनी उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनीच तोडीस तोड उत्तर दिल्याने गावगुंडांना पळता भुई थोडी झाली.

नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या साकूर येथे अपक्ष उमेदवार मा खासदार समीर भुजबळ सायंकाळी सभेकरता पोहोचले. येथील सभा मंडपाच्या आवारात ही सभा सुरू असताना गावातील काही गावगुंडांनी तेथे येत सभेत हस्तक्षेप करीत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्याला भीक घातली नाही. उलट गावकरी समीर भुजबळांना सभा पूर्ण करण्याचा आग्रह करीत होते.

गावकऱ्यांच्या या एकजुटीमुळे गावगुंडांना पळता भुई थोडी झाली. यावेळी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ म्हणाले की, विद्यमान आमदार हे विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाहीत. उलट विकासाच्या गोष्टी आम्ही करतो आणि या विकास कामांमध्ये गावगुंडांना आणून सभा उधळण्याचा ते प्रयत्न  करीत आहेत. अशा गूंडगिरी अन दडपशाहीला कोणी भीक घालू नका. विरोधकांना आता पराभव दिसू लागला असून ते असे प्रकार करीत आहेत.  त्यामुळे अशा गावगुंडांच्या आणि आमदाराच्या दडपशाहीला कुणी घाबरू नये. आपल्याला नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करायचा आहे. आणि ही गुंडगिरी आपण सर्व मिळून सगळेच हद्दपार करू, असे स्पष्ट बोलत भुजबळ यांनी ग्रामस्थांना आ केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.