नाशिक,६ सप्टेंबर २०२२ – सहा वर्षांपूर्वी नाट्यगृह तुमच्या दारी* या नाट्यचळवळीला नाशिक शहरात प्रारंभ झाला. या मागची मूळ संकल्पना कल्पेश कुलकर्णी या तरुण रंगकर्मींची. मात्र अनेक दिवस ही चळवळ अविरतपणे सुरू असून देखील काहीशी अज्ञात राहिली. मात्र तीन वर्षांपूर्वी नाशिकच्या दिग्गज मान्यवरांनी तिला खऱ्याअर्थाने एक ओळख मिळवून दिली. पुढे कोविडच्या काळात यात सक्तीचा खंड पडला. पर्यायच नव्हता.यावर्षी पुन्हा ही नाट्यचळवळ जोमाने उभी राहिली आहे.
आता तर हे नाट्यगृह निघालंय महाराष्ट्र दौऱ्यावर
आजमितीस प्रायोगिक नाटकांचा प्रेक्षकवर्गच नाहीसा झालाय. प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकांच्या प्रतिसादाची नितांत गरज आहे… प्रायोगिक नाटक देखील दर्जेदार असतात, पण त्यातील कलाकार हे तितकेसे प्रथितयश नसल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तर अद्यापही अनेकांना नाटक म्हणजे काय, ते कसं असतं हे सुद्धा माहिती नाही ही वस्तुस्थिती आहे. तसेच सर्वच रसिकप्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन प्रयोग पाहता येत नाही बऱ्याच मर्यादा असतात. नाटक पाहण्यापासून कुणी वंचित राहू नये, ही कला ओटीटीच्या जमान्यात जिवंत राहावी, प्रेक्षक नाटकाकडे वळावेत, नवे नाट्यरसिक घडावेत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही संकल्पना वास्तवात राबवली जात आहे. शहरातील विविध सोसायटींमध्ये नाटक नेऊन प्रत्यक्ष नाट्यगृहात आसनस्थ होऊन प्रयोग पाहिल्याची अनुभूती देण्याची ही चळवळ.. खऱ्या अर्थाने एक तळमळ आहे. आता हे नाट्यगृहच आपल्या दारी आल्यावर सुजाण प्रेक्षकांची ही जबाबदारी आहे नाट्यगृहात जाऊन नाटक बघण्याची आणि रंगभूमीला जिवंत ठेवण्याची.या वेळेस ही चळवळ नव्या रूपात आली आहे.मखमली पडदे, लाईट्स, म्युजिक आणि सगळी तंत्रं वापरून नाटक सादर होत आहे.
रंगभूमीची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या कलाकारांचा तसेच सामाजिक क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान. तसेच या द्वारे प्रायोगिक नाटकातील कलाकार त्यांच्या नाटकांची मोफत प्रसिद्धी (Promotion) करू शकतील.ही चळवळ अविरत सुरू ठेवण्याचा या पांडुरंगकर्मीचा मानस आहे. पण ही चळवळ जिवंत ठेवणं हे सर्वस्वी नाट्यरसिकांच्या हातात आहे, आपल्या सोसायटीत प्रयोगाचे आयोजन करण्यासाठी 9552435076 या क्रमांकावर संपर्क करा.
नाट्यगृह तुमच्या दारीअंतर्गत या वर्षीचे नाटक आहे चलो सफर करे
लेखक : शांतनू चंद्रात्रे
दिग्दर्शन : पांडुरंगकर्मी
नेपथ्य : ऋषिकेश पाटील
प्रकाश योजना : चैतन्य गायधनी
संगीत : नितीन पावरा, ललित श्रीवास्तव
वादक : वैष्णवी शेजवलकर (पेटी), आयुष शिरसाठ (पखवाज)
रंगभूषा : स्वरांजली गुंजाळ
रंगमंच सहाय्य : नेहा उपाध्याय
कलाकार : ऋतुजा पाठक, कल्पेश कुलकर्णी, अनिकेत इनामदार, हनुमान जाधव, प्रद्युम्न शेपाळ, अमेय आचार्य