विजय सेल्स द्वारे ॲपल उत्पादनांवर विशेष ऑफर्सची घोषणा
ॲपल डेज मोहिमेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाची केली घोषणा
मुंबई,दि. २८ डिसेंबर २०२२ –आपण २०२२ या वर्षाला निरोप देत असताना भारताची आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर साखळी विजय सेल्सने ३१ डिसेंबर पर्यंत ॲपल डेज मोहिमेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाची घोषणा केली आहे. ग्राहकांना आपल्या १२० पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स आणि विजयसेल्स डॉट कॉमवरही विविध डील्सचा आनंद घेता येईल.
ॲपलच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी या ग्राहकोपयोगी रिटेल कंपनीने नव्याने आलेल्या आयफोन १४ वर एक खूप खास किंमत आणली आहे. ग्राहकांना हा फोन फक्त ६१,९०० रूपयांना घेता येईल. आयफोन १४ ची किंमत सामान्यतः ७९,९०० रूपये आहे. तो ७४,९०० अधिक एचडीएफसी बँक कार्ड्ससवर ५००० रूपयांच्या तात्काळ सवलतीवर विकला जात आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यायचा असेल आणि त्याचे एक्स्चेंज मूल्य किमान ५००० असेल तर विजय सेल्सकडून त्यावर आणखी ३००० रूपये वाढवले जातील आणि एकूण सवलतीची रक्कम १८,००० रूपयांपर्यंत जाऊन नवीन आयफोन १४ तुम्हाला फक्त ६१,९०० रूपयांत मिळेल.
इतर आयफोन्स तसेच सीरिज ८ घड्याळे, एअरपॉड्स प्रो (२ जनरेशन) यांच्यावर मॅगसेफ चार्जिंग केस, मॅकबुक्स, आयपॅड्स, घड्याळे, ॲपल केअर +, ॲपल एक्सेसरीज यांच्यावरही अनेक डील्स उपलब्ध आहेत.
स्मार्टफोनच्या वर्गवारीत आयफोन १४ ची किंमत ६९,९०० रूपयांपासून सुरू होते, आयफोन १४ प्लस ७८,६९९ रूपयांपासून, आयफोन १४ प्रो १,२६,१०० पासून, आयफोन १४ प्रो मॅक्स १,३५,८०० रूपयांपासून, आयफोन १२ ची किंमत ५२,९०० रूपयांपासून सुरू होते तर आयफोन १३ ची किंमत ६२,९०० पासून सुरू होते.
आयपॅडच्या श्रेणीत आयपॅड ९ जनरेशनची सुरूवात २५,७०० रूपयांपासून होते, आयपॅच १० जनरेशनची सुरूवात ३९,९४० पासून, आयपॅड एअर ५ जनरेशन ५१,७०० रूपयांपासून तर आयपॅड प्रोची सुरूवात ७३,००० रूपयांपासून होते.
लॅपटॉपच्या श्रेणीत मॅकबुक एअर एम१ चिपसोबत ७७,९०० रूपयांपासून सुरू होतो, मॅकबुक एअर एम२ चिप ९५,५०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम२ चिपसोबत १,०४,३०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम१ प्रो चिपची सुरूवात १,०७,५०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम१ प्रो मॅक्स चिपची सुरूवात २,८०,३०० रूपयांपासून होते.
स्मार्टवॉचच्या श्रेणीत एप्पल वॉच सीरिज ८ ची सुरूवात ३९,९०० रूपयांपासून, एप्पल वॉच एसई (२ जनरेशन) २६,००० पासून तर एप्पल वॉच अल्ट्राची सुरूवात ८२,३०० रूपयांपासून होते. ऑडिओ श्रेणीत एअरपॉड्स प्रो (२ जनरेशन) २३,४०० रूपयांच उपलब्ध असेल.