सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा शाईफेकण्याचा प्रयत्न

भीम आर्मीचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

0

सोलापूर,दि.१६ ऑक्टोबर २०२३ –सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा शाईफेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.या आधी मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली होती.सोलापुरच्या पालकमंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली.

सरकारी नोकऱ्यांमधलं खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचं सांगण्यात येत आहे. अजय असं या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.

सोलापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील सोलापूर मध्ये दाखल झाले त्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.कोणत्याही प्रकारे आंदोलन होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली होती.परंतु तरीही भीम आर्मीच्या या पदाधिकाऱ्याने मार्ग काढत कंत्राटी पद्धतीचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे.

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा फोटो जनस्थान ऑनलाईन वर प्रसिद्ध करण्यात येतील
फोटो पाठवताना आपल्या ग्रुप च्या नावाचा उल्लेख असावा
email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.