मुंबई दि,२२ नोव्हेंबर २०२४ – महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६१ टक्के मतदान झाले होते.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गेल्या ३० वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे.अंतिम आकडेवारीनुसार यंदा राज्यभरात सरासरी ६६.०५ टक्के मतदान झाले.हे वाढलेले मतदान कोणासाठी फायदेशीर ठरणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सची (Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll)चर्चा सुरु आहे. मतदान संपल्यानंतर म्हणजे २० नोव्हेंबरला काही संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले होते. यापैकी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीची सरशी होताना दिसत होती.
परंतु प्रजातंत्र च्या एक्झिट पोल महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजा नुसार या एक्झिट पोलनुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १४९ जागांवर विजय मिळले. तर महायुतीला फक्त १२७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे प्रजातंत्र च्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी बहुमतासाठी लागणारा १४५ जागांचा आकडा पार करुन सरकार स्थापन करु शकते.
प्रजातंत्र च्या एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीला १४९ जागांवर विजय मिळेल. यामध्ये मराठवाड्यातील ३०, मुंबईत १८, उत्तर महाराष्ट्रात २३, ठाणे आणि कोकणात १७, विदर्भात ३१ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ३० जागांचा समावेश आहे.
तर प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यातील २८८ पैकी १२७ विधानसभा मतदारसंघात विजय मिळेल. तसे घडल्यास भाजप अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीने १४५ ची मॅजिक फिगर गाठण्याची कसरत करणार का आणि त्यामुळे घोडेबाजार होणार का,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.