नाशिक,दि,१८ ऑक्टोबर २०२४ – नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे दोन अधिकारी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले.वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त व लेखा विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रुसून अटक केली आहे.कनिष्ठ लेखाधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद कार्यालय नाशिक.किरण रंगनाथ दराडे वय-४० व. कनिष्ठ सहाय्यक (लेखा )वित्त विभा सचिन प्रभाकर पाटील वय ४० अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण १८ सेवा पुस्तके लोकसेवक क्रमांक एक यांच्याकडे जमा केली होते सदर १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे ७००/-रुपये याप्रमाणे १८ सेवा पुस्तकांचे १२६००/- रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती अकरा हजार रुपयांची मागणी करून सदर लाचेची रक्कम लोकसेवक क्रमांक एक यांच्या सांगण्यावरून लोकसेवक क्रमांक दोन यांनी सदरची रक्कम लाचेची आहे हे माहीत असताना देखील स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक,श्रीमती मीरा वसंतराव आदमाने पो. हवा.पंकज पळशीकर पो.हवा.प्रमोद चव्हाणके पो.हवा. संदिप वणवे यांच्या पथकान पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अपर पोलिस अधिक्षक,माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.