नाशिक –नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती कारणात आली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशान्वये हि नियुक्ती करण्यात आल्याचे समजते आहे . नाशिक महापालिकेचा कारभार तात्काळ स्वीकारावा असे आदेश उप-सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. नाशिकमधील ७ हजार सदनिकांच्या संभाव्य घोटाळ्याचे प्रकरण कैलास जाधव यांच्यावर शेकले असून, त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.
म्हाडाची घरे हस्तांतरीत न झाल्याप्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभापतींनी महापालिका आयुक्तांना पदावरून हटवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. आज अखेर बृहन्मुंबई महापालीकेचे सहाय्यक आयुक्त रमेश पवार यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे..