मुंबई – “अप्पी आमची कलेक्टर” एक नवीन मालिका झी मराठीवर २२ ऑगस्टपासूनप्रेक्षकांच्या भेटीला आली,ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे.अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी खेडे गावात राहत असते, त्या गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत, तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.
ह्या प्रेरणात्मक मालिकेचे लेखन अभयसिंग जाधव ह्यांचे असून दिग्दर्शन आशुतोष बाविस्कर ह्यांचे आहे. ह्या मालिकेत शिवानी नाईक सोबत रोहित परशुराम प्रमुख भूमिकेत असणार आहे.
सातारा आणि कोल्हापूर येथे “अप्पी आमची कलेक्टर” या मालिकेच्या निमित्ताने रॅलीच आयोजन करण्यात आले होते. ह्या रॅली साठी सातारकरांनी व कोल्हापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ह्या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे आणि आपली सगळ्यांची लाडकी शिवानी नाईक (अप्पी) ह्या दोघीनी दणक्यात ढोल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शिवानी नाईक ही उत्कृष्ट ढोलवादन करते.
हुशार अशा,कलासंपन्न शिवानी नाईक कलेक्टरच्या भूमिकेत आपला ठसा उमटवणार आहे. सदर मालिका २२ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७:00 वाजता , सोमवार ते शनिवार प्रदर्शित होत असून या मालिकेचे चित्रण सातारा आणि आसपास च्या गावात होत आहे.