मुंबई,दि २२ सप्टेंबर २०२४ –‘बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi )च्या घरात यंदा रिअॅलिटी शोचा स्टार, स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल सहभागी झाला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने चाहत्यांना घायाळ केलं. जिगरबाज तरुणाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चांगलाच धुमाकूळ घालता होता. निक्की आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला त्याचा प्रवास संपला आहे. अरबाजला कमी मत देऊन अखेर रसिक प्रेक्षकांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातल्या या चॉकलेट बॉय अरबाजने ताकदीच्या जोरावर अनेक टास्क जिंकले. या आठवड्याचा तो कॅप्टनदेखील होता.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून प्रत्येक आठवड्याला कोणाला ना कोणाला बाहेर पडावं लागतं. अरबाजने त्याच्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निरोप घेताना अरबाज म्हणाला,”महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मला आपलंसं केलं आहे. माझा प्रवास त्यांनी पाहिला आहे. या खेळात माझं काही चुकलं असं मला वाटलं नाही. निक्कीसोबतची जर्नी खूप छान होती”