साहित्य संमेलनाला जाण्यासाठी शहरातील विविध भागातून बसची व्यवस्था
शहरातील १२ मार्गावरून दर १५ मिनिटाला धावणार बस : वेळापत्रक जाहीर
नाशिक – नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटी मधील कुसुमाग्रज नगरीत ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तमामा नागरिकांना निमंत्रण असून सर्वाना प्रवेश खुला आहे, या संमेलनासाठी नाशिकच्या विविध ठिकाणाहून तीनही दिवस बसेसची व्यवस्था केलेली आहे. या बसेस सकाळी ८ वाजेपासून सुटणार असून त्या साधारण दर १५ मिनीटांनी उपलब्ध हाेतील.
संमेलनात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र पास, तिकीट अथवा तत्सम बाबीची काेणती गरज असणार नाही. मात्र काेराेनाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध जारी केले आहेत, जसे लसीकरण झालेले असणे आणि मास्कचा वापर करणे इत्यादी याचे पालन सर्वांनी करुन सहकार्य करावे.
काही प्रतिनिधी संमेलन स्थळी येऊन ऐनवेळेस प्रतिनिधी शुल्क भरु शकतात. त्यांना असे शुल्क तेथे भरता येईल. बाहेर गावाहून काही प्रतिनिधींना निवासाची व भाेजनाची व्यवस्था नकाे असेल त्यांना प्रतिनिधी शुल्क भरावे लागणार नाही.
नाशिक शहरातून संमेलन स्थळी जाण्यासाठी बस चे वेळापत्रक खालील प्रमाणे