राज ठाकरे यांचे नाशिक शहरात आगमन   

0

नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे दोनदिवसीय खाजगी नाशिक दौऱ्यावर आले असून  आज सकाळी त्यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. सकाळी ९.३० वाजता श्री शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन करून राज ठाकरे यांचे विमानाने ओझर येथे आगमन झाले.

या वेळी  राज ठाकरे यांच्या सोबत सौ. शर्मिलाताई ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगांवकर, महिला सेनेच्या अध्यक्षा रिटाताई गुप्ता, हर्शल देशपांडे ,मनोज हाटे, सचिन मोरे आदि सहकारी उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज] ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलिम (मामा) शेख, प्रवक्ते पराग शिंत्रे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, नितीन माळी, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, नामदेवराव पाटील, सुरेश घुगे, अनंत सांगळे, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाताताई डेरे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, कामगार सेनेचे चिटणीस प्रकाश कोरडे, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे, सरचिटणीस मिलिंद कांबळे, प्रमोद साखरे, सिद्धांत मंडाले, संघटक अमित गांगुर्डे, जिल्हाध्यक्षा कामिनिताई दोंदे व पद्मिनिताई वारे, शहराध्यक्षा अर्चनाताई जाधव व अरुणाताई पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, निकीतेश धाकराव, मनविसेचे गणेश मोरे, कौशल पाटील, मनोज गोवर्धने, महेश लासुरे, संदेश जगताप, ललित वाघ, विजय आगळे, शाम गोहाड, संदिप दोंदे, निलेश सहाणे, जयेश ढिकले, योगेश पाटील, शैलेश शेलार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  राज ठाकरे यांचे नाशिक पुण्यनगरीत स्वागत केले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.