नाशिकचे कलावंत साजरा करणार ‘रंगोत्सव’

पर्यावरणपूरक कोरडे रंग वापरून कलावंत साजरी करणार रंगपंचमी

0

नाशिक,दि, २९ मार्च २०२४ –नाशिकचे कलावंत रंगपंचमी साजरी करणार आहे.नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणारे सर्व कलावंत रंगांचमीच्या माध्यमातून एकत्र येत असतात. जनस्थान ग्रुपच्या माध्यमातून हा रंगपंचचमीचा सोहळा नाशिकच्या प सा नाट्यमंदिर परिसरात साजरा केला जातो .शनिवार दिनांक ३० मार्च दुपारी १ वाजता रंगपंचमी चे आयोजन करण्यात आले असून नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनस्थानचे प्रमुख अभय ओझरकर यांनी केले आहे.

पाणी ,ऑईलपेंट रंग न वापरता पर्यावरण पूरक कोरडे रंग वापरून हा रंगोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या वेळी नाशिकमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे सिने कलावंत,साहित्यिक ,वादक,गायक ,चित्रकार,शिल्पकार,पत्रकार हे सर्वजण एकत्र येतात.जनस्थानच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम राबवून कलावंतांना एकत्र आणण्याचे काम होत असते त्यातील रंगपंचमी हा एक उपक्रम. तरी नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्वानी रंगपंचमीसाठी एकत्र यावे असे आवाहन जनस्थानच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!