तब्बल १८ वर्षांनंतर ‘डॅडी’ सुटला, दाऊदला नडणाऱ्या अरुण गवळीला जामीन

0

नागपूर दि,३ सप्टेंबर २०२५ – Arun Gawli Bail अंडरवर्ल्डमधील ‘डॅडी’ म्हणून ओळखला जाणारा कुख्यात पण तितकाच चर्चेत असलेला नेता अरुण गवळी अखेर तब्बल १८ वर्षांच्या कारावासानंतर मुक्त झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोग्य आणि वयोमानाचा विचार करून त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर गवळी थेट मुंबईकडे रवाना झाले असून, त्यांच्या पुनरागमनाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

📌 हत्या प्रकरण आणि शिक्षा ( Arun Gawli Bail)

२००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली गवळींना अटक झाली होती. दीर्घ सुनावणीनंतर २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी हा निकाल उच्च न्यायालयात आव्हान दिलं, पण २०१९ मध्ये उच्च न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली.

📌 सर्वोच्च न्यायालयात जामीन

गवळींचे वय आणि वाढत्या आजारपणाचा विचार करून सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करत सत्र न्यायालयाच्या अटींवर आधारित जामीन मंजूर केला. मात्र, फेब्रुवारी २०२६ मध्ये अंतिम सुनावणी होणार असल्याने गवळींचे भविष्य अजूनही अनिश्चित आहे.

📌 राजकीय प्रवास

गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण केल्यानंतर गवळींनी राजकारणात प्रवेश केला. ‘अखंड महाराष्ट्र सेना’ स्थापन करून त्यांनी स्थानिक पातळीवर पकड मिळवली आणि एकदा विधानसभेतही पोहोचले. त्यांचा मुंबईच्या गिरणगाव भागात मोठा प्रभाव राहिला. मात्र, खटले, शिक्षा आणि दीर्घ कारावासामुळे त्यांची राजकीय कारकीर्द थांबली. आता सुटकेनंतर ते राजकारणात पुनरागमन करतील का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!