तुरूंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी दिली पहिली प्रतिक्रिया 

0

नवी दिल्ली,दि,११ मे २०२४ – कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार जेल मध्ये असलेले  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. बाहेर येताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी जंगी स्वागत केले.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.“मी पुन्हा परत येण्याचे वचन दिले होते आणि मी आलो आहे.आपल्याला या हुकूमशाही विरोधात लढायचे आहे”,असे ते म्हणाले.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल 
“मी लवकर येईन असे म्हणालो होतो आणि आलो आहे. हनुमानजींच्या आशीर्वादाने मी तुम्हा सर्वांमध्ये आलो. देशातील कोटी जनतेने मला आशीर्वाद दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आभार. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे. मी तन मन लावून हुकूमशाही विरुद्ध लढा देत आहे. आज तुमच्यामध्ये आल्यामुळे चांगले वाटले. आज  दुपारी एक वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत”,असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.