आशाताईं भोसलेंनी घेतली लतादीदींची भेट : तब्येतीबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई – ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर गेल्या २७ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आशाताई भोसले ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या त्यांनी लतादीदींची भेट घेतली आणि तब्येतीबद्दल विचारपूस केली. लतादीदींची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती आशाताईंनी दिली.

८ जानेवारीला  त्यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.आज सकाळीस राज ठाकरे यांनी लतादीदींनी भेट घेतली. लतादीदी यांची तब्येत ठीक आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चुकीच्या बातम्या चालवू नका, मी डॉक्टरांना सांगितलं खाली जाऊन मेडिकल अपडेट द्या. जेणेकरून लोकांच्या मनातील प्रश्नांना योग्य उत्तर मिळतील, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.