अष्टौप्रहर स्वरहोत्र : नाशिक मधील ‘दिग्गज गायक, कलाकार,सृजन,रसिक आणि भक्तांची मांदियाळी 

0

रविवार पौष शु.दशमी शके १९४४, अर्थात १ जानेवारी २०२३. या दिवशी ‘काळाराम मंदिर’ या ‘पौराणिक आणि ऐतिहासिक महात्म्य वास्तूत भारतीय शास्त्रीय संगीत ‘गायन, वादन, नृत्य, आणि चित्रकला’ या अभिजात कलांचं ‘सेवा-समर्पण’. दिवसाच्या आठ प्रहराशी निगडीत विविध ‘थाट, राग, घराणी, पद्धती, वैशिष्ठ्य आणि गायकी’ सोबतीला विविध वाद्ये, वादन कौशल्य, नृत्य आणि विविध कलांचा संगम अनुभवयास मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात गत १२/१२ दिवसांपासून नाशिक शहरातील जवळपास १००/१२५ कलाकार, तितकेच स्वयंसेवक, २५०/३०० महिला आणि संगीत शिकणारे विद्यार्थी व्यस्त आहेत.

प्रभू श्रीरामच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी, पौराणिक आणि ऐतिहासिक महात्म्य लाभलेली काळाराम मंदिराची पवित्र वास्तू, पहाटे ५:३० वाजताची काकड आरती, मंगलमय वातावरणात सुरु होणारी अभिजात संगीताचे सूर ‘विनायक रानडे, एनसी देशपांडे, आर्की. समीर देशपांडे, अॅड.अजय निकम आणि सीएल कुलकर्णी’ या सृजनांचं ‘प्रयोजन, संकल्पन, आरेखन, नियोजन आणि निवेदन’, सोबतीला काळाराम संस्थान यांचं आयोजन आणि नाशिक मधील समस्त कलाकारांचं समर्पण’ या त्रिवेणी संगमातून नाशिक शहरात रुजू होतेय, एक नवीन संस्कृती –

एका अपूर्व विचार, संकल्पना, स्वराविष्कार आणि संधी याचे साक्षीदार होणे, हे आम्हा नाशिककरांचे परम कर्तव्य होय. सर्वांची सुयोग्य साथ लाभल्यास एक नवीन संकल्पना रुजविण्याचा, सर्वांना एकाच मंचावर, एकाच विचारधारेवर रुजवण्याचा हा संकल्प…

एकीकडे ‘स्वर-होत्र’ सुरु होताना, उदबत्यांचा घमघमाट, विविधरंगी रांगोळ्यांनी सजलेली वास्तू, प्रहराशी  रंगसंगती साधत पैठणी-नऊवारी ल्यालेल्या महिला ‘श्रीराम चरणी’ पुष्पांजली वाहून प्रसन्न पहाटे वातावरणाची निर्मिती करणार आहेत.

नाशिक शहरातील सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला असून तयारीत गुंतले आहेत. सोबतच अनेक दानशूर व्यक्तींनी यात आपापल्या परीने या कलाकारांच्या मदतीसाठी विविध सेवा पुरवण्याची जबाबदारी पेलली.अशा अभूतपूर्व. एकत्रित आणि आश्वासक सेवाकार्याचे साक्षीदार होण्याची संधी नाशिककर गमावणार नाहीत, ही आशा.
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!