मुंबई,३ मार्च २०२३ – मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.आज सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हे हल्लेखोर हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले. संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात आले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.