पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खानवर हल्ला

गोळीबारात चारजण जखमी : एकाचा मृत्यू (व्हिडीओ पहा)

0

लाहौर – पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या मोठ्या रॅलीत गोळीबाराने हाहाकार उडाला आहे.माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून ते यात जखमी झाले आहेत. या गोळीबारात इमरान खान यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती पाकिस्तानी मीडिया कडून समोर आली आहे. ही घटना जफर अली खान चौकात घडली. इमरान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले आहेत.तर एकाचा मृत्यू झाला आहे.इम्रानखान यांना लाहोर च्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे हल्लोखोरांच्या AK-47 रायफलच्या निशाण्यावर इमरान खान यांच्यासह पाकिस्तानातील अनेक दिग्गज नेते होते. त्यांनी इमरान खान यांच्या हत्येचा कट आखला होता, असा आरोप पीटीआय पक्षाकडून करण्यात आलाय. रॅलीत अचानक गोळीबार सुरु झाल्यानंतर परिसरात मोठा गदारोळ झाला. रॅलीत सहभागी झालेले नागरीक सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि लगेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात हल्लेखोर यशस्वी देखील झाले. पण त्यांच्यापैकी एक हल्लेखोर पकडला गेला. पोलिसांनी त्याला अटक केलीय. यावरून पाकिस्तानमध्ये सर्व काही सुरळीत सुरु नाही हे अधोरेखित होतंय.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची दखल घेतली आहे. त्यांनी या हल्ल्याप्रकरणी चौकशीचे आदेश जारी केले आहेत. तसेच त्यांनी या हल्ल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!