आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

0

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर  हल्ला केल्याची मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज या ठिकाणी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.या घटनेचे थरारक व्हिडीओ देखील समोर आले आहेत.दरम्यान घटनेच्या वेळी परिसरात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात पूरेपूर प्रयत्न केला.

दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारे शिवसैनिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिवसैनिकांनी गाडीला घेराव घालून त्यानंतर गाडीवर दगड फेकल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान गाडीवर दगड फेकल्यानंतर उदय सामंत त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले.

उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. यावेळी चौकाजवळ ही घटना घडली. विशेष म्हणजे चौकाजवळच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडी बघितलं त्यानंतर हल्लाबोल केल्याचा व्हिडीओ समोर आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!