भारतामध्ये ऑडी SQ8 साठी बुकिंग सुरू; १७ मार्चला होणार अधिकृत लॉन्च

0

मुंबई,११ मार्च २०२६ – Audi SQ8 India launch जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी Audi ने भारतात आपल्या नवीन परफॉर्मन्स लक्झरी एसयूव्ही Audi SQ8 साठी अधिकृतपणे बुकिंग सुरू केले आहे. ग्राहकांना ही आकर्षक एसयूव्ही myAudi Connect App किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ५,००,००० रुपयांची प्रारंभिक रक्कम भरून बुक करता येणार आहे. कंपनी १७ मार्च २०२६ रोजी भारतात या दमदार एसयूव्हीचे अधिकृत लॉन्च करणार आहे.

शक्तिशाली इंजिन आणि स्पोर्टी परफॉर्मन्स (Audi SQ8 India launch)
ऑडीच्या लोकप्रिय Q-सीरिजमध्ये धोरणात्मक स्थान मिळवणाऱ्या Audi SQ8 मध्ये 4.0 लिटर V8 TFSI इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन तब्बल ३७३ kW शक्ती आणि ७७० Nm टॉर्क निर्माण करते. त्यामुळे ही एसयूव्ही उच्च परफॉर्मन्स आणि स्पोर्टी ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

या एसयूव्हीमध्ये ऑडीचे प्रसिद्ध quattro all‑wheel drive सिस्टम देण्यात आले आहे. त्यासोबत सेल्फ-लॉकिंग सेंटर डिफरेंशियल, अ‍ॅडप्टिव्ह एअर सस्पेन्शन स्पोर्ट आणि ऑल-व्हील स्टीअरिंगसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली दिली आहे. त्यामुळे वाहनाला उत्कृष्ट स्थिरता, नियंत्रण आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.

लक्झरी आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट संगम
Balbir Singh Dhillon यांनी सांगितले की, “Audi SQ8 ही दैनंदिन लक्झरी आणि उच्च दर्जाच्या स्पोर्टी परफॉर्मन्सचा परिपूर्ण संगम आहे. या एसयूव्हीमधील शक्तिशाली इंजिन आणि विशिष्ट ‘S’ कॅरेक्टर तिला एक अद्वितीय परफॉर्मन्स SUV बनवतात.”त्यांनी पुढे सांगितले की भारतात Audi Q8 फॅमिलीला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नवीन SQ8 भारतीय बाजारात लक्झरी आणि परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टी शोधणाऱ्या ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेईल, असा कंपनीला विश्वास आहे.

मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध
कंपनीने सांगितले की ही परफॉर्मन्स एसयूव्ही मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे उच्च परफॉर्मन्स आणि लक्झरी कारचे चाहते असलेल्या ग्राहकांनी लवकरात लवकर बुकिंग करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.नवीन SQ8 ही ऑडीच्या लक्झरी SUV पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वाची भर मानली जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शक्तिशाली इंजिन आणि स्पोर्टी डिझाइनमुळे ही एसयूव्ही भारतातील प्रीमियम कार बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करू शकते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!