ऑस्ट्रियाच्या शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार,९ विद्यार्थ्याचा मृत्यू

0

ग्राझ (ऑस्ट्रिया), १० जून २०२५ – Austria School Shooting ऑस्ट्रियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहर ग्राझ मधील एका हायस्कूलमध्ये मंगळवारी सकाळी भीषण गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात ७ विद्यार्थी, एक शिक्षक आणि हल्लेखोर अशा एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

विद्यार्थ्याच ठरला हल्लेखोर(Austria School Shooting)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतीलच एका विद्यार्थ्याने बंदूक घेऊन इमारतीत प्रवेश केला आणि समोर दिसणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर या विद्यार्थ्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह घटनास्थळी सापडला आहे.

संपूर्ण परिसरात अलर्ट
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला.शाळा रिकामी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.स्पेशल टास्क फोर्स “कोब्रा” यांना पाचारण करण्यात आले असून, चौकशी सुरु आहे.

जखमींवर उपचार सुरू

२८ जणांना शारिरीक इजा झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांच्या डोक्याला गोळ्या लागल्या असून त्यांची अवस्था चिंताजनक आहे.
सरकारचे आवाहनऑस्ट्रियाचे गृहमंत्री आणि चांसलर ख्रिश्चन स्टॉकर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सोशल मीडियावरूनही सतर्कतेचे संदेश दिले आहेत.

मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात मृतांमध्ये 7 विद्यार्थी, एक शाळेचा कर्मचारी आणि स्वतः गुन्हेगाराचा समावेश आहे. शाळेतील गोळीबाराची चौकशी करण्याची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्सकडे देण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहरासाठी रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की काही लोक जखमी देखील झाले आहेत, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!