अविराज तायडे यांच्या स्वरांतून मिळाली प्रयोगशील ,अलवार  सुरांची अनोखी अनुभूती

विश्वास ग्रुप तर्फे 'सूर विश्वास 'या अनोख्या मैफलीचे आयोजन

0

नाशिक(प्रतिनिधी) : शास्त्रीय संगीतातील प्रयोगशील जाणीवांनी समृध्द गायनाची अनुभूती रसिकांना पं. अविराज तायडे  यांच्या अभिजात स्वरांनी दिली आणि संगीताच्या एका वैशिष्ठपूर्ण मैफिलीने रसिकांना तृप्त केले.शब्द सुरांचा अनोखा स्वरसाज मैफल संपल्यावरही सर्वांच्या मनावर रेंगाळत होता , सुरातून ईश्वरभक्तीचा अनोखा संगम अनुभवण्यास मिळाला.

नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला  व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास ‘या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफिलीचे हे चौदावे पुष्प पं अविराज तायडे यांनी गुंफले विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.नितीन वारे (तबला), दिगंबर सोनवणे (पखवाज), भक्ती बोरसे (संवादिनी)  अमित भालेराव (तालवाद्य)आशिष रानडे (गायन )संस्कार जानोरकर ,(तानपुरा) आर्या.गायकवाड(तानपुरा) यांनी साथसंगत केली .सुत्रसंचलन डॉ.स्मिता मालपुरे यांनी केले.विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी,  येथे हा कार्यक्रम संपन्न झाला उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळणार आहे.

पं. अविराज तायडे यांनी मैफिलीची सुरुवात बंदिशीने केली.राग बैरागी भैरव होता ,ताल विलंबित एकताल होता.शब्द होते ‘ पिया के घर  पिया बिन मोसे रहो न जाय भयी बावरी .प्रेम आणि आस यांच्यातील दैवी जाणीव घेऊन सजलेले हे शब्द नादब्रह्म घेऊन अवतरले आणि स्वरांना श्रीमंत करून गेले.त्यानंतर त्रितालातील , ‘ओ सावरिया घर नही आये’

बंदिशीतून नात्याची अलवार  वीण उलगडली.त्यानंतर राग विभास सादर केला ,शब्द होते ये नरहरी नारायण आणि कैसे कुवरवा जायल हमरा.ताल द्रुत त्रिताल होता. भावभक्तीची ही स्वरांची संततधार रसिक घेत होते नामस्मरण करत होते .त्यानंतर संत तुकडोजी महाराजांचे भजन ‘ मन रे हरी नामकी गीता तून जीवनाचं सार मनाशी किती निगडीत असते याची प्रचिती म्हणजेच जीवनाचा अर्थ शोधायला लावणारे होते. मैफीलीची सांगता ‘ जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले’ या भैरवीने केली. शब्द सूर आपल्या आत्म्याशी किती सहज नाते जोडतात याचा अलवार अनुभव मैफिलीत आला.

सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन व ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला .

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लिना बनसोड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची प्रमुख उपस्थिती होती. लीना बनसोड , म्हणाल्या की , ‘ नाशिकचे सांस्कृतिक संचित जपण्याचे आणि जपवणूक करण्याचे संस्कृती संवर्धक काम विश्वास ठाकूर यांच्या सारखी   कृतिशील व्यक्ती करत आहेत हे शहराचे वैभव आहे.’

रेडिओ विश्वास च्या समन्वयक ऋचिता ठाकूर म्हणाल्या की ‘ रेडिओ विश्वासने अल्पावधीत विविध लोकाभिमुख कार्यक्रम सादर करून लोकप्रियता मिळवली आहे ,त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न,तसेच बदलत्या घटनांचा शोध ,वेध घेऊन समाज बदलाचे माध्यम म्हणून प्रभावी ठरले आहे,रेडिओ विश्वास जनतेचा आवाज आहे व तो जगभर ॲप च्या माध्यमातून पोहोचला आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

लीना बनसोड यांच्या हस्ते अविराज तायडे यांचा सन्मान करण्यात आला. ऋचिता ठाकूर यांनी बनसोड यांचा सन्मान केला.दत्तात्रय कोठावदे यांनी गोदा तिरीची पत्रवारी करून विश्वास ठाकूर यांच्या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रह व त्यांच्या स्वभावाचे गुणग्राहक पैलू उलगडले.कलावंताचा तसेच आला.मिलिंद हिरवे ,किशोर कदम ,सौ.शुभांगी तायडे , दत्तात्रय कोठावदे ,राजा पाटेकर आदी मान्यवरांचा सन्मान विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष,डॉ.मनोज शिंपी,विनायक रानडे, ॲड.नंदकिशोर भुतडा,कविता गायधनी,डॉ.श्री श क्षीरसागर,स्वाती पाचपांडे,डॉ प्राचार्य  प्रशांत पाटील ,डॉ.हेमंत ओस्तवाल,महाराष्ट्र टाइम्स चे वरिष्ठ उपसंपादक रमेश पडवळ यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास २०० हून अधिक रसिक उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.