ISRO ने वाचवले ४ अंतराळवीरांचे प्राण -भारतीय वैमानिक शुभांशू शुक्ला यांचा जीव बचावला!

फाल्कन-9 च्या लिकमुळे मोठा अपघात टळला; ISRO अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांचे तांत्रिक धाडस

0

नवी दिल्ली | १४ जून २०२५:Axiom SpaceX mission भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली तांत्रिक सक्षमता सिद्ध केली आहे. अमेरिकेच्या Axiom-4 मिशनसाठी उड्डाणास सज्ज असलेल्या SpaceX Falcon-9 रॉकेटमधील गंभीर दोष उघड करत ISRO ने चार अंतराळवीरांचे प्राण वाचवले, ज्यामध्ये भारताचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हेही सहभागी होते.

🔍 काय घडलं होतं नेमकं?(Axiom SpaceX mission)
Falcon-9 रॉकेटचे ११ जून रोजी उड्डाण नियोजित होते. मात्र, ISRO अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या सूचनेनुसार “लो टेंपरेचर लिक टेस्ट” मध्ये एक द्रव ऑक्सिजनची गळती आढळून आली. तपासणीत ऑक्सिडायझर लाइनमध्ये वेल्डिंग क्रॅक (भेग) असल्याचे समोर आले, जो रीसायकल आणि रिफर्बिश्ड स्टेजमध्ये असल्याने धोका गंभीर होता.

ISRO च्या तज्ज्ञांनी स्पेसX ला फक्त तात्पुरते उपाय न करता पूर्णतः ते भाग बदलण्याची जोरदार मागणी केली. “सेफ्टी फर्स्ट, लाँच लेटर” ही भूमिका घेऊन १३ सदस्यीय भारतीय पथकाने फ्लोरिडामधील Kennedy Space Center येथे थेट हस्तक्षेप केला.

भारतासाठी अभिमानाची बाब
या मिशनमध्ये भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर सहभागी होते. भारताचे शुभांशू शुक्ला हे पहिल्यांदाच अशा आंतरराष्ट्रीय मिशनचा भाग आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ISRO चा कठोर आणि जागरूक निर्णय केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जागतिक अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा “सेफ्टी माईलस्टोन” ठरतो.

🧠 डॉ. व्ही. नारायणन यांचा अनुभव कामी आला
क्रायोजेनिक इंजिनचे जाणकार असलेल्या नारायणन यांनी द्रव ऑक्सिजनसारख्या धोकादायक इंधनाशी संबंधित धोके स्पष्टपणे ओळखले. त्यांच्या नेतृत्वाखाली ISRO तज्ज्ञांनी धाडसाने निर्णय घेतला आणि SpaceX च्या मोहिमेची दिशा वाचवली.

🛰️ जगाने मान्य केला ISRO चा दर्जा
पोलंड आणि हंगेरीनेही ISRO च्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दिला असून, जागतिक तज्ज्ञांनी भारताच्या अंतराळसंस्थेच्या “सेफ्टी स्टँडर्ड्स” ची स्तुती केली आहे. हा क्षण भारतासाठी केवळ तांत्रिक नव्हे, तर राजनैतिक महत्त्वाचाही दाखला देणारा ठरतो.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!