आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन

0

पुणे – आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे याचे आज पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले ते ८१ वर्षांचे होते.त्यान्ची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार सुरु असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली.

आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले.‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते.इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले.आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते.केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

आयुर्वेद, योग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आयुर्वेदाचार्य डॉ.बालाजी तांबे यांना श्रद्धांजली

 आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोकसंदेशात म्हणतातआयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देशविदेशातही प्रसार केला. आहारविहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहेहा संदेश त्यांनी सहजसोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी आरोग्यविषयक लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेअसे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.