मुंबई,दि, ८ फेब्रुवारी २०२४ –आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी व त्यांचा मुलगा पक्ष सोडणार अशी चर्चा होती अखेर आज त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे.बॉलिवूड मध्ये ही बाबा सिद्दीकी यांचा मोठा दबदबा आहे.आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राजकारणातील समीकरणे बदलतील असे तज्ञाचे मत आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला.मिळालेल्या माहितीनुसार,बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024