बाबाज थिएटर्स तर्फे आज पासून ३ दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन

0

नाशिक,दि.३० सप्टेंबर २०२३ – बाबाज थिएटर्स तर्फेआज पासून ३ दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.१७ सप्टेंबर ला बाबाज थिएटर्सच्या कार्याला २३ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त नाशिककर रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देणे या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यात आले आहे.अशी माहिती बाबाज थिएटर्सचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी दिली.

वर्धापन दिना निमित्य आज पासून (दि. ३० सप्टेंबर) ते ३ ऑक्टोबर या दरम्यान परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता सादर होणार असून त्यात चार वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यात आज ३० सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली पूर्वक “सुरसम्राज्ञी लता” हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात एकूण १२ गायिका व ६ गायक लतादीदींची गाणी सादर करतील. या कार्यक्रमाचे नियोजन संतोष फासाटे व हरीश भाई ठक्कर यांचे आहे. १ ऑक्टोबर रोजी बाबाज थिएटर्सचा नावाजलेला कार्यक्रम “राग रंग” सादर होणार आहे. या कार्यक्रमात नाशिक मधील सुमधुर गायक व गायिका चित्रपटातील मराठी व हिंदी रागांवर आधारित गाणी सादर करणार आहेत.

२ ऑक्टोबर रोजी हेमंत काळे प्रस्तुत “दादा कोंडके हिट्स” हा दादा कोंडके यांच्यावर प्रदर्शित झालेल्या गाण्यांचा आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच ३ ऑक्टोबर रोजी मराठी एकपात्री नाटक “नटसम्राट” नाशिक मधील डॉ. राजेश आहेर सादर करणार आहेत. या कार्यक्रमा अगोदर नाशिक मधील सर्व अग्रगण्य दैनिकांच्या (वृत्तपत्र) संपादक आणि सांस्कृतिक प्रतिनिधी यांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. आमच्या सांस्कृतिक कार्यात वेळोवेळी मोलाचा वाटा उचलणाऱ्या दैनिक वृत्तपत्रांचा, पत्रकारांचा त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न याद्वारे असेल असे बाबाज थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे यांनी सांगितले.

३ ऑक्टोबर रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री सुरेश भटेवरा व सुप्रसिद्ध चित्रकार, कवी व अभिनेते सी एल उर्फ चारुहास कुलकर्णी यांच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

दिनांक १७ सप्टेंबर रोजी बाबाज थिएटर्स संस्थेच्या कार्याला २३ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त नाशिककर रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देणे या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने १३ सप्टेंबर रोजी पहिले पुष्प सादर झाले. त्यात सुप्रसिद्ध नृत्यांगना निकिता सिंग यांचे एकल कथक नृत्य आणि सितार वादनाचा कार्यक्रम झाला.

दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुसरे पुष्प गुफतांना आरडी कराओके क्लब तर्फे नाशिकच्या कलाकारांचा किशोर, रफी, मुकेश, लता, आशा यांनी गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम सादर केला गेला. १७ सप्टेंबर रोजी झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात ३६ गुणी जोडी या मालिकेतील अनुष्का सरकटे व आयुष संजीव या कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला व स्वप्निल गोडबोले, मुग्धा कराडे यांनी अप्रतिम गाणी सादर केली. दोन्ही कार्यक्रमांचे संगीत संयोजन अमोल पालेकर यांनी केले.

आज पासून सुरु होणाऱ्या या सोहळ्याचा सर्व ज्येष्ठ नागरिक सुजाण रसिकांनी आग्रहाने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबाज चे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रा. डॉ. प्रितीश कुलकर्णी, डॉ.प्रमोद शिंदे, योगिता पाटील, एन सी देशपांडे, जे पी जाधव, शामराव केदार, नारायण गायकवाड, दिलीपसिंह पाटील व अमोल पालेकर यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.