बाबज थिएटर्स तर्फे आज सांगीतिक मैफल व कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

विनोद राठोड,सई मोरणकर.भूषण दादा काळे.यांचा कृतज्ञता सन्मान पुरस्काराने होणार गौरव  

0

नाशिक दि,१ जानेवारी २०२५ –बाबाज थिएटर्स तर्फे नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी “सिंगर फ्रेंड्स”प्रस्तूत बिनाका गीत माला या अविस्मरणीय सांगीत मैफलीचे सादरीकरण प्रशांत जुन्नरे यांच्या संकल्पनेतून प्रतिथयश गायक डॉ. विकास देव, राजेश दाणी,शैलेंद्र बकरे,ज्ञानेश्वर चौधरी ,अपर्णा देशपांडे, प्राजक्ता गायधनी हे संगीत संयोजक अमोल पाळेकर यांच्या वाद्यवृंद संचलानातून सादर होणार आहे या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध निवेदक ज्ञानेश वर्मा हे आपल्या खास शैलीतून निवेदक करतील.तसेच याच कार्यक्रमा अंतर्गत नाशिकच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उउल्लेखनीय कार्य करीत असलेल्या तीन मान्यवरांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती व निमा या संस्थेचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या शुभ हस्ते प्रमुख अतिथी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

बाबाज थिएटर्स  दर महिन्याच्या १ तारखेला ज्येष्ठ नागरीक आणि सुजाण संगीतप्रेमी रसिकांना विरंगुळा या उद्देशाने कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे “संगीत मैफल” आणि “कृतज्ञता सन्मान पुरस्कार” सोहळ्याचे आयोजन करीत असते.आज बुधवार १ जानेवारी या उपक्रमाचे ५० वें पुष्प आम्ही सादर करीत आहोत.या वेळचे पुरस्कार्थीं .१) श्री. भूषण दादा काळे. ( सामाजिक).अध्यक्ष औदुंबर दत्त मंडळ ट्रस्ट.नाशिक.२) श्री.विनोद राठोड.( सांस्कृतिक).सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार,रंगकर्मी.३) सई मोरण कर.(सांस्कृतिक).सुप्रसिद्ध अभिनेत्री.यांचा “कृतज्ञता सन्मान पुरस्कार”देऊन गौरव होणार आहे.

तरी या रौप्य महोत्सवी वर्षातील सोहळ्याची बातमी आपल्या दैनिकात प्रसिद्ध करावी असे आवाहन प्रशांत जुन्नरे , कैलास पाटील, योगिता पाटील, जे.पी.जाधव,शामराव केदार,दीलीपसिंह पाटील, प्रा.प्रीतीश कुलकर्णी, मिलिंद जोशी,यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!