बाबाज् थिएटर्सतर्फे १ ऑगस्टला प्रांजली बिरारी यांच्या ‘प्रेम व श्रावणसरी”मैफिलीचे आयोजन
वैविध्यपूर्ण मराठी-हिंदी गाण्यांची मेजवानी...
नाशिक – शहरातील सांस्कृतिक चळवळ समृद्ध करणाऱ्या बाबाज् थिएटर्सतर्फे ज्येष्ठ नागरिक तसेच संगीतप्रेमींसाठी एक ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता प.सा. नाट्यगृहात सौ. प्रांजली बिरारी-नेवासकर प्रस्तुत ‘प्रेम आणि श्रावणसरी’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत श्रोत्यांना वैविध्यपूर्ण मराठी-हिंदी गाण्यांची मेजवानी अनुभवयास मिळेल.
या मैफिलीत सौ. प्रांजली बिरारी-नेवासकर, संदीप थाटसिंगार, मानसी पाटील, आदिती मोरे या मराठी व हिंदी गीते सादर करतील. संगीत संयोजन अमोल पाळेकर यांचे असेल. तर अनिल धुमाळ, जय भालेराव, महेश कुलकर्णी, स्वरांजय धुमाळ, देवानंद पाटील, शुभम जाधव हे संगीत साथ देतील. ध्वनी व्यवस्था सचिन तिडके यांची असेल. तर मैफिलीचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा रत्नपारखी करतील.
या मैफलीसाठी संकल्प स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक शहर नामदेव शिंपी पंचमंडळ, शांतुषा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, विश्वास को-अॉप सहकारी बँक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कृतज्ञता सन्मान पुरस्कार !
गेल्या २१ वर्षांपासून ‘बाबाज् थिएटर्स’ सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. तर गेल्या तीन वर्षांपासून खास जेष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.कलाकारांच्या नवीन संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना श्रवणीय रसिक मिळवून देणे हा त्या मागचा हेतू आहे. दर महिन्याच्या एक तारखेला नाशिक मधील नामवंत सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असणाऱ्या तीन जेष्ठ कलाकारांचा नाशिककर आणि ‘बाबाज्’ तर्फे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वेळचा पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तसेच ना.ए. सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
यंदाचे पुरस्कारार्थी सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी (सामाजिक). संगीतकार उल्हास तांबे व आनंद ओक (सांस्कृतिक) आहेत.कार्यक्रम विनामूल्य असून सर्व जेष्ठ नागरिक व संगीतप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘बाबाज् थिएटर्स’ चे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे, शामराव केदार, प्राध्यापक प्रितीश कुलकर्णी, मामा तांबे, एन.सी. देशपांडे, जे.पी. जाधव, दिलीपसिंह पाटील यांनी केले.