नाशिक जिल्ह्यातील ‘या’ पर्यटन स्थळांवर बंदी : जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे आदेश
नाशिक- नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा १२ हजाराच्या वर गेला असून याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्ह्यातील पुरातन वास्तू ,किल्ले,स्मारके,पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येणार्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या बाबत नवीन आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर शनिवार आणि रविवार मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी वाढत असते त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.आज पासूनच नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद करण्यात येणार असून पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळे
ब्रह्मगिरी पर्वत,अंजनेरी पर्वत,दुगारवाडी धबधबा,पहिने ,हरिहर किल्ला ,साल्हेर किल्ला ,भास्करगड,रामशेज किल्ला,भावली धरण,गंगापूर धरण परीसर ,वैतरणा धरण या पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.