सलग ४ दिवस बँका बंद राहणार 

0

मुंबई – येत्या २६ मार्च पासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहे.बँका बंद राहणार असल्याने सर्वसामान्याच्या जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिनांक २६ आणि २७ मार्चला बँकांना सुट्ट्या आहेत आणि २८ आणि २९ मार्च ला बँक कर्मचाऱ्यांचा संप असल्याने बँका सलग चार दिवस बंद असणार आहे.त्यामुळे आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत उरकून घ्या.

ऐन मार्च महिन्यातील शेवटचा आठवड्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप होत असल्यानं सामान्य ग्राहकांसोबतच बॅंकिंग क्षेत्राला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. या संपामुळं स्टेट बॅंक ऑफ  इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या संपात ५ लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांनी केला  आहे.

बॅंकांमधील कंत्राटीकरण,बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध,बॅंकेतील कामाचे आऊटसोर्सिंग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर बॅंक कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत. सोबतच लोकसभेतील अधिवेशनात बॅंकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील या संघटनांनी दिलेला आहे.

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, एआयबीओए, बेफी आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन संपात सहभागी होणार आहे.  सहकारी बॅंका, काही विदेशी बॅंका, जुन्या खासगी बॅंका, ग्रामीण बॅंकामधील कर्मचारी देखील संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!