उपवासासाठी स्वादिष्ट भगर-साबुदाणा ढोकळा रेसिपी

0

Bhagar Sabudana Dhokla Recipe उपवास म्हटलं की लगेच आठवतात ते साबुदाणा वडे, खिचडी किंवा थालिपीठ. पण आज आपण पाहूया थोडं हटके आणि पौष्टिक पदार्थ भगर-साबुदाणा ढोकळा. हा पदार्थ हलका, पचायला सोपा आणि उपवासात ऊर्जा देणारा आहे.

लागणारे साहित्य (४ जणांसाठी)

भगर पीठ १ कप

साबुदाणा (भिजवून मिक्सरमधून वाटलेला) ½ कप

दही (फेटलेले) ½ कप

हिरवी मिरची २ (बारीक चिरलेली)

आलं १ टीस्पून (किसलेले)

मीठ चवीनुसार (सेंधव मीठ वापरावे)

साखर १ टीस्पून (ऐच्छिक)

लिंबाचा रस १ टीस्पून

बेकिंग सोडा ¼ टीस्पून

कोथिंबीर २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

फोडणीसाठी (Bhagar Sabudana Dhokla Recipe)

तूप २ टेबलस्पून

जिरे १ टीस्पून

कढीपत्ता ५-६ पाने

हिरवी मिरची १ (लांब काप करून)

कृती

एका भांड्यात भगर पीठ, वाटलेला साबुदाणा, दही, आलं, मिरची, मीठ, साखर व थोडं पाणी घालून गुळगुळीत पीठ तयार करा.

हे पीठ १५२० मिनिटं झाकून ठेवा.

वाफवण्यासाठी ढोकळ्याचं भांडं तयार करून त्याला तुपाचा हात लावा.

पीठात लिंबाचा रस व बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिक्स करा.

लगेचच हे पीठ भांड्यात ओतून १५२० मिनिटं वाफवून घ्या.

ढोकळा शिजल्यावर थंड करून चौकोनी तुकडे करा.

एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून जिरे, कढीपत्ता व हिरवी मिरचीची फोडणी द्या आणि ती ढोकळ्यावर ओता.

वरून कोथिंबीर भुरभुरा आणि चटणी किंवा दहीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स

दही आंबट नसेल तर चवीला छान हलका आंबटपणा यावा म्हणून थोडा लिंबाचा रस जरूर घालावा.

फोडणीत शेंगदाणे घातले तर चव आणखी खुलते.

उपवासाबाहेरही हा पदार्थ सकस नाश्त्यासाठी उत्तम आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!