नाशिकच्या ‘भगवंतराव मिसळ’ चे नव्या वास्तूत भव्य पुनरागमन !

२९ जुलै रोजी ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांच्या उपस्थितीत नव्या भगवंतराव हॉटेलचा भव्य शुभारंभ

0

नाशिक, दि. २८ जुलै २०२५ Bhagwantrao Misal Nashik नाशिक शहरातील ११३ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले ‘भगवंतराव’ हे पारंपरिक हॉटेल आता नव्या स्वरूपात, पूर्वीच्याच मेनरोडवरील जागेत, पुन्हा एकदा नाशिककरांच्या सेवेत सज्ज झाले आहे. हे हॉटेल केवळ एक खाद्यस्थळ नव्हे, तर नाशिककरांच्या आठवणींचा अनमोल ठेवा आहे.

मिसळीच्या खमंग इतिहासाला उजाळा देणारा नव्या युगातला कट्टा!

सन १९१२ साली कै. भगवंतराव अष्टपुत्रे यांनी नागपंचमीच्या मुहूर्तावर सुरू केलेले हे ठिकाण ‘पोहे, उपवासाचे पदार्थ व गोड फराळ’ यासाठी प्रसिद्ध होते. पुढे त्यांच्या पुत्र कै. विष्णुपंत यांनी मिसळ प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर वसंतराव, दत्तोपंत व वामनराव यांनी मिसळीच्या थाटात कोशिंबीर, फरसाण, दही, पापडाची जोड देऊन ‘भगवंतराव मिसळ’ या नावाने एक खास ब्रँड तयार केला.

नव्या वास्तूचा शुभारंभ नागपंचमीला (Bhagwantrao Misal Nashik)

मंगळवार, दि. २९ जुलै रोजी नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर विख्यात नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांच्या उपस्थितीत नव्या भगवंतराव हॉटेलचा भव्य शुभारंभ होणार आहे. या वेळी शहरातील अनेक नामवंतही आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

दिवाळी फराळापासून मिसळपर्यंत खाद्यपदार्थांची परंपरा अखंडित

भगवंतराव’ हॉटेल हे फक्त मिसळपुरते मर्यादित न राहता, उत्तम दर्जाचे पेढे, चकली, बेसन लाडू, दिवाळी फराळ हे पदार्थ देखील ग्राहकांच्या मनात घर करून आहेत. सुहास व सौ. मंगलाताई अष्टपुत्रे यांच्या पुढाकाराने हॉटेलने गुणवत्ता व आपुलकी यांची परंपरा कायम ठेवली आहे.

नाशिककरांसाठी हक्काची चव नव्या रूपात पण जुनाच स्वाद!

आज चौथी पिढी व्यवसाय चालवत असून, भगवंतराव हॉटेल हे केवळ खानावळ नव्हे तर पारंपरिकता, सामाजिक संवाद आणि चवदार खाद्यसंस्कृती यांचे प्रतीक बनले आहे.

📍 महत्वाची माहिती:

स्थापना: 1912 | ठिकाण: मेनरोड, रविवार करंजा, पंचवटी, नाशिक

प्रकार: खानावळ + मिठाई विक्री 

खास पदार्थ: मिसळ, चकली, डिंक लाडू, पेढे

ओळख: नाशिकची पहिली पारंपरिक खानावळ

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!