( हरिअनंत,नाशिक) १९ जून २०२२ ते १३ जून २०२५ पर्यन्त शनिदेव ८ राशीचे कल्याण करणार त्या ८ राशी आहेत.अर्थात शनिदेव सर्वग्रहात अतिशय महाशक्तीशाली ग्रह आहे. शनी नेहमी सत्य स्थिती जाणून,परिस्थितीचे अवलोकन करून फल प्रदान करीत असतो. शनि कडे कुठलीच शिफारस, वशिला कार्य करीत नाही. शनीला दुटप्पी,डावपेची, स्त्रीला निष्कारण त्रास देणाऱ्या व्यक्ती मुळीच आवडत नाही.डावपेची, दुटप्पी व्यक्तीला शनी योग्य वेळी धडा शिकवल्याशिवाय गप्प राहत नाही. हवेत उडणाऱ्याला शनी जमिनीवर आणतो. शनी अतिशय न्यायप्रिय,शक्तिशाली आहे आणि हीच बलशाली शक्ती शनिदेव कमी- अधिक फरकाने ८ राशीना प्रदान करणार आहेत.
शनीचा हा फलादेश या आठ राशींच्या जन्मराशीवर अवलंबून आहे. ठेवलेल्या नाव राशीवर नाही.अर्थात जन्मराशी नावाला ८३ टक्के फायदा तर ठेवलेल्या नाव राशीला १७ टक्के फायदा निश्चित होणार.जन्म पत्रिकेत शनीची उत्तम भावस्थिती प्रगतिकारक असते.शनीची भावस्थिती योग्य नसेल तर आयुष्यात विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.
शनीची ही कृपा २९ एप्रिल २०२२ पासूनच आरंभ झालेली आहे पण या कृपेची गती १९ जून २०२२ ला गतिशील होणार मात्र या ८ राशींच्या जन्मकुंडलीतील शनीची भावस्थिती कशी आहे यावर या ८ राशींची होणारी प्रगती अवलंबून आहे. हे ही या ८ राशींच्या व्यक्तींनी लक्ष्यात घेतले पाहिजे. या ८ राशी आहेत मकर, मिथुन, तुळ, वृषभ, वृश्चिक मेष, कुंभ आणि मीन
मेष-मेष राशींच्या कुंडलीत शनीची भावस्थिती उत्तम असेल, तर १३ जून २०२५ पर्यन्त मागे वळून गेल्या दिड- दोन वर्षात झालेल्या मानसिक ,आर्थिक त्रासाची आठवण न करता आलेल्या योग्य वेळेचा उपयोग करून प्रगती कडे लक्ष द्यावे. प्रगतीचे लक्षण दिसत नसल्यास आपल्या विश्वासू माहितगार व्यक्तीला पत्रिका दाखवावी.शनीच्या कृपेनं आणि आपल्या कुंडलीतील शनीच्या योग्य भावस्थितीने मेष राशींच्या व्यक्तींची आर्थिक बाजू अतिशय भक्कम होणार. अनेक वर्षांपासून अडकलेले, ज्या रक्कमेची आशा सोडून दिली.अशी रक्कम अचानक मिळणार. सातत्याने, मोठ्या कष्टाने उभा केलेल्या व्यवसायाची गती वाढणार, प्रगती होणार. नवीन व्यवसायाची सुरुवात होऊन अद्भुत यश प्राप्त होणार १३ जून २०२५ पर्यंत ही प्रगतीची घोडदोड याच गतीने क्रमशः वाढत राहणार
वृषभ-वृषभ राशीसाठी हा राजयोग आहे. नोकरीत बढती होणार, पर्मनंट होण्याची भीती असणाऱ्यांना आनंदाची वार्ता प्राप्त होणार, शनि संबंधित व्यवसाय सुरू करणाऱ्याचा भाग्योदय होणार. तेल, कन्स्ट्रक्शन, लोखंड, कारखाना, मशिनरी,इत्यादी व्यवसायात यश
मिथुन (क्रमशः) भाग -१६३
साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत
