१३ जून २०२५ पर्यंत या आठ राशींचा होणार भाग्योदय : शनिशास्त्र (भाग-२)  

हरिअनंत,नाशिक

0

(हरिअनंत,नाशिक) आपण मागील लेखात बघितले १९ जून २०२२ ते १३ जून २०२५ पर्यन्त शनी आठ राशींचा भाग्योदय करणार. त्या भाग्यवान राशी आहेत; मकर, मिथुन, तुळ, वृषभ, वृश्चिक,मेष, कुंभ आणि मीन या राशीचे शनी भाग्य निश्चित बदलणार आर्थिक सुबत्ता,यश, आनंद कुटुंबात सातत्याने होणारा कलह समाप्त होणार, निश्चित मात्र या आठ राशींच्या जन्मपत्रिकेतील शनीची भाव स्थिती उत्तम असेल त्यांचा भाग्योदय निश्चित होणार, मात्र पत्रिकेतील शनीची स्थिती उत्तम नसेल तर आपण नाराज न होता आपण प्रयत्न करायचे घाबरायचे नाही. शोधणाऱ्याला निश्चित सापडते आणि न थकता प्रयत्न करणाऱ्याला निश्चित यश मिळतं.

शनी भाग्य बदलणार म्हणून आपण हातावर हात ठेवून गप्प बसायचे नाही.वृषभ राशींच्या व्यक्ती  अतिशय कष्टाळू म्हणून ओळखल्या जातात,मोठ मोठे स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते  कष्ट घेण्यात वृषभ राशीच्या व्यक्ती कुठे कमी पडत नाही पण कधी- कधी वृषभ राशीच्या व्यक्तींचे कष्ट प्रयत्न करूनही निष्फळ ठरतात त्याचे कारण शनीची भावस्थिती. ही भावस्थिती यांनी समजून घेतली पाहिजे.काही अति हुशार व्यक्तीं म्हणतात हे ग्रह वगैरे आपण मानत नाही. आपण लाथ मारू तिथे पाणी काढू पण असं लाथ मारून कुठे पाणी काढता येत नाही. सूर्याच्या उष्णतेचा,आणि चंद्राच्या शितलतेचा ज्या प्रकारे अनुभव स्पष्ट जाणवतो.  सूर्य- चंद्राचा परिणाम पृथ्वीतलावरील   प्रत्येक व्यक्तीवर  सृष्टीवर होतो तसाच इतर ग्रहांचा परिणाम हा होतोच. ही जाणीव आपण मनी बाळगली, त्यासाठी प्रयत्न, उपाय आपण करू शकतो अर्थात उन्हात तापायचे नसेल तर आपण सावली शोधतोच. वर सांगितलेल्या आठ राशींचा भाग्योदय शनी करणार पण  शनीची आपल्या जन्मपत्रिकेतील भाव स्थिती  काळजीपूर्वक जाणून घ्यावी.

मिथुन- राशीचा भाग्योदय अतिशय   आनंददायी होणार. गेल्या पंचवीस वर्षात मिथुन राशीच्या व्यक्ती जे करू शकल्या नाही अशी अद्भुत कार्य, प्रगती मिथुन राशीच्या व्यक्ती करणार.  आरोग्याविषयी असलेली तक्रार समाप्त होणार. अकल्पित यशदायी घटना घडणार.

तुळ– तुळ राशीच्या व्यक्तीच्या व्यापारात प्रगती होणार,आर्थिक स्थिती मजबूत होणार,गेल्या तीन- चार वर्षांपासून प्रयत्न करूनही न होणारे कार्य सहजरित्या पूर्ण होण्याचा आनंद मिळणार. नोकरीत बढती होणार. कुटुंबातील वाद मिटणार आणि अतिशय आनंदी वातावरण निर्माण होणार. कुटूंबात मंगलकार्य होणार– अनेक वर्षांपासून डोक्यात घर करून राहिलेली चिंता समाप्त होणार. तुळ-अचानक धनलाभ  (क्रमशः) भाग – १६४

साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.