भावार्थ दासबोध – भाग ३२

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ३ समास ३
पुन्हा एकदा काही वैभव मिळवले. पुन्हा काही पैसे साठवले. पण मुलबाळ नसल्यामुळे घर बुडाले म्हणून नाराज राहू लागला. मूलबाळ नसल्यामुळे वांझ असं त्याला लोक म्हणू लागले. मग तो नाना उपाय करायला लागला. देवाला मुलासाठी नवस केले. तीर्थ,व्रत, उपवास, धरणे, पारणे मांडले. विषयसुख तर बाजूलाच राहिले वांझपणामुळे दुःख झाले; दरम्यान त्याला कुलदैवत पावले आणि वृद्धी झाली. उशिरा मूलबाळ झाल्यामुळे त्या लेकरावर खूपच प्रेम करायला लागले. दोघेपण एक क्षणभर देखील त्याच्याविना राहिनासे झाले. त्याला काही झाले मोठमोठ्याने आक्रंदन करू लागले. अशा स्थितीमध्ये नाना देवांची पूजा करायला लागले पण अचानक ते बालक मरण पावले. पूर्व पापामुळे अशा तर्‍हेने खूप दुःख झालं आणि शेवटी निपुत्रिकत्व आलं. आम्हाला वांझ केलं असा ते देवाला दोष देऊ लागले.

आमच्याकडे पैसे आहेत त्याच आम्ही काय करायचं? ते पैसे नसले तरी चालेल पण आम्हाला अपत्य पाहिजे. आपण त्यासाठी लागेल ते सगळं करण्यास तयार आहोत. अशा वांझपणामुळे नावही फार बदनाम होईल असे तो दुःखाने आक्रंदन करायला लागला. आमची संसार वेली का खुंटली? आता आमचं भविष्य काय? कुलस्वामिनीचा कोप का झाला? कुलदीप का विझला? आता जर मला मूल झालं तर मी निखाऱ्यावर चालून जाईल किंवा गळ्याला गळ टोचून घेईल. मी श्रीदेवीचा भुत्या होईल, मुलाचं नाव केरपुंजा ठेवेल. नाकात नथ घालीन. असे विचित्र नवस बोलायला लागले पण माझे मनोरथ पूर्ण कर. असे अनेक देवाना नवस केले. अनेक गोसावी धुंडाळले. गटागटा विंचू गिळले. संमंधाची पूजा केली. अंगात देव आले तर त्याचे पण पूजा केली.

ब्राह्मणास केळी-आंबे दान केले. नाना तंत्राचे प्रयोग केले, रुद्र मंत्र प्रयोग केले तरी काही भविष्य बदललं नाही. नशीब बदललं नाही. मुलगा काही झालाच नाही. शेवटी वृक्षाखाली जाऊन अंघोळ करण्याचा प्रयोग केला, फळती झाडे करपली, असं नाना दोष निर्माण झाले. पुत्रालोभासाठी नाना उपाय केले. सगळे वैभव सोडले आणि भ्रमिष्ट जीव झाला तेव्हा खंडेराव आणि कुलस्वामिनीची कृपा झाली. मनोरथ पूर्ण झाले म्हणून स्त्री-पुरुष आनंदले. आता पुढे काय होतं पुढे काय होते ते लक्ष देवून ऐका.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, स्वगुणपरीक्षा नाम समास तृतीय समाप्त.

दशक तिसरा समास चौथा स्वगुण परीक्षा
उदंड मुलेबाळे जन्माला आली,त्यामुळे लक्ष्मी निघून गेली. सगळे भिकेला लागले. मुलांना काही खायला मिळेना. लहान मुलं खेळत होती, काही रांगत होती, काही पोटामध्ये होती काही इकडे तिकडे घरामध्ये फिरत होती. कन्या आणि पुत्रांची दाटी झाली होती. दिवसेंदिवस खर्च वाढला. उत्पन्न कमी झालं .कन्या मोठ्या झाल्या उपवर झाल्या त्यांना उजवण्यासाठी धन नाही. माय बाप संपन्न होते त्यांच्याकडे भरपूर धन होतं. त्यामुळे लोकांमध्ये प्रतिष्ठा, मान होता. पहिली नांदणूक घरी झाली नाही त्यामुळे मान नाही असा लोकांमध्ये भ्रम आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दारिद्र्य आले. आता खाणारी तोंडे वाढली त्यामुळे उद्वेग, काळजी वाढली. कन्या उपवर झाल्या, मुलांना बायका आणायला हव्या. मुले तशीच राहिली तर लज्जास्पद. दारिद्र्य असलेल्या घरात ही कशासाठी जन्माला आली? असं वाटायला लागलं. लोकलज्जा आमचे वडिलांचे नाव जाईल. आता लग्नासाठी आम्हाला कर्ज कोण देईल? आधी घेतलं कर्ज घेतलं होतं तेच परत दिलेल नाहीये त्यामुळे मोठीच चिंता निर्माण झाली आहे. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!