“आयामा इंडेक्स २०२२”चे रविवारी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन

0

नाशिक –अंबड इंडस्ट्रीज अँड मनुफॅक्चरर्स अससोसिएशन (आयमा) या उद्योजकीय सस्थेच्या वतीने १८ मार्च ते २१ मार्च २०२२ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचे भूमिपूजन रविवार  दि. १३मार्च २०२२ रोजी नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त श्री कैलास जाधव यांच्या शुभहस्ते पार पडणार असल्याचे “आयामा इंडेक्स २०२२” चे चेअरमन श्री धनंजय बेळे ,आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब यांनी सांगितले.

“आयामा इंडेक्स २०२२” आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचे सर्व स्टॉल बुक झाले असून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रासाठी प्रगतीसाठी  उपयोगी असणार आहे. विविध देशातील प्रतिनिधी व त्यांचे शिस्टमंडळही औद्योगिक विकासासाठी या प्रदर्शनाला भेटी देणार असल्याचे धनंजय बेळे  यांनी सांगितले. या औद्योगिक प्रदर्शनात  मॅग्नेटिक महाराष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन,  एमआयडीसी ची प्लॅटिनम स्पॉन्सरशिप , गोल्ड स्पॉन्सरशिपसाठी  जिंदाल, सिल्व्हर स्पॉन्सरशिपसाठी एचएएल,यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे  कोस्पॉन्सरशिप गोविन्द झा ग्रुप, रॉयल इक अँड इक्विपमेंट,अलोक लेबर ऑर्गनायझेसशन, हिरानंदानी, हॉस्पीटलीटी पार्टनर साठी रॅडिसॅन, हेल्थ पार्टनरसाठी एसएमबीटी, थर्ड आय पार्टनर युनिव्हर्सल कॉम्युनिकेशन्स गिफटींग पार्टनरसाठी ऑल इंडिया गिफ्ट्स मॅनेजर,  महानगरपालिका, महावितरण, एमटीडीसी, एमपीसीबी, एनएसआयसी, आदींचे प्रोयोजकत्व व सहकार्य लाभले आहे.

भूमिपूजनासाठी स्टॉल धारकांनी व हितचिंतकांनी सकाळी १०:३० वा डोंगरे वस्तीगृह मैदानावर उपस्थित रहावे असे आवाहन आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, “आयामा इंडेक्स २०२२” चे चेअरमन श्री धनंजय बेळे ,सरचिटणीस ललित बुब, आयपीपी वरून तलवार, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र कोठावदे, योगिता आहेर, गोविन्द झा  व आयमा कार्यकारीणीनें केले आहे

या आयामा इंडेक्स मधून नवीन उद्योजकांना पुढे जाण्यासाठी चालना मिळणार असल्याचे व नवीन गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे धनंजय बेळे यांनी सांगितले या औद्योगिक प्रदर्शनामध्ये इनिजिनीरिंग, मशीन टूल्स, मंचत्रनिक्स, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिकस व  इंडस्ट्रीयल  कंजुमरस, टेक्स्टाईल्स, आयटी व ऑफीस ऑटोमेशन, नॉन कन्व्हर्शनल एनर्जी, सोलर सिस्टिम, बँकिंग इंशुरंस, फायनान्स एजुकेशन, टुरिजम तसेच फूड प्रॉडक्ट्स करीता  स्वतंत्र अद्ययावत स्टॉल व दालन उभारण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची  ३ विभागात विभागणी करण्यात आलेली असून ओपन स्पेसचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले असल्याचे सांगितले.

नाशिकमध्ये जवळपास ४ तो ५ वर्षांपासून औद्योगिक प्रदर्शन न  झाल्यामुळे ह्या आयामा इंडेक्स २०२२ ला मोठा प्रतिसाद मिळणार आहे या  प्रदर्शनामुळे शहरापासून खेड्यापर्यंत हॊणाऱ्या देशाच्या विकासाला व प्रगतीला चांगली चालना मिळण्यास मदत होणार आहे. अंबड सातपूर मधील बरेचसें उद्योजक निर्यात मोट्या प्रमाणात करतात व मोठ्या  कंपन्या  उत्पादने निर्यात करतात विविध क्षेत्रातील अनेक प्रकारची देशी व विदेशी उत्पादने बनवतात या अशा अनेक उत्पादनांची माहिती जागतिक पातळीवर, देश पातळीवर, गाव पातळीवर व्हावी त्याच्या मालाला बाजारपेठ मिळावी त्यांचा विकास व्हावा व विस्तार वाढावा, रोजगार वाढावा, नाशिकचा विकास झपाट्याने व्हावा, व सर्व उद्योगांनी एकत्रित येऊन नाशिकचे चांगले ब्रॅंडिंग व्हावे तसेच नाशिक शहरात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी यासाठी आयामा इंडेक्स २०२२ चा फायदा होणार आहे.

आयामांचे हे औदयोगिक प्रदर्शन सर्व सुविधांयुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहे.स्टॉलधारकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत असेही धनंजय बेळे  यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.