महाराष्ट्राच्या राजकारणार मोठा भुकंप; अजित पवार उमुख्यमंत्री
शिवसेने नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट
मुंबई,दि.२ जुलै २०२३ –महाराष्ट्राच्या राजकारणार पुन्हा मोठा भुकंप शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीत उभी फूट पाडण्यात पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह गळाले लागले आहेत. राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा थोड्याच वेळात शपथविधी होणार असून अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.यासाठी अजित पवार ३० ते ४० आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत.
अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राजेश टोपे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त सर्वच नेते हजर होते. त्यामुळे लगबगीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही देवगिरी गाठले होते. मात्र, सुळे पोहोचण्या आधीच राष्ट्रवादीत फूट पडली आहे.
याबाबतची माहिती सुळे यांना कळताच त्यांनी देवगिरी सोडले.देवगिरीवर हा फाटाफुटीचा खेळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जोरदार खलबते सुरू होती. देवगिरीवरील बंड यशस्वी झाल्याचा संदेश मिळताच राजभवनवर शपथविधीची तयारी करण्यात आली असून .उपमुख्यमंत्री म्हणून आज अजित पवार यांच्यासह भुजबळ यांचाही शपथविधी होणार आहे.
अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार नाराज
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार आणि पक्षातील प्रमुख नेत्यांवर नाराज आहेत. पाटणा येथील विरोधी एकता बैठकीत राहुल गांधींना सहकार्य करण्याच्या आणि व्यासपीठावर सहभागी होण्याच्या शरद पवारांच्या एकतर्फी निर्णयामुळे अजित पवार नाराज असल्याचे मानले जात आहे.
#WATCH | NCP leader Ajit Pawar takes oath as Maharashtra Deputy CM in the presence of CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis pic.twitter.com/3l3p1Fi9nB
— ANI (@ANI) July 2, 2023