नवी दिल्ली – महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक धक्का बसला आहे.स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.एलपीजी ग्राहकांना आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे.आता नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त १५ सिलिंडर मिळणार आहेत.
त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे गृहिणींना आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदान कनेक्शन धारक हवे तितके सिलिंडर घेऊ शकत होते. पण आता नव्या नियमांनुसार याला आता बंधन आले आहे. त्यामुळे वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ १५ सिलेंडर मिळणार आहेत.
अनेक दिवसांपासून विभागाला अशा तक्रारी येत होत्या की, घरगुती विनाअनुदानित रिफिल व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने तेथे वापरल्या जात आहेत.त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहेअनुदानित सिलिंडरही ठराविक मिळणार आहे. तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात फक्त १२ सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज लागल्यास विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागतील.