मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने १ ऑगस्टला मध्यरात्री अटक केली होती. ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.आज कोठडीची मुदत संपल्यानंतर संजय राऊत यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.महत्त्वाचं म्हणजे ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली. २२ ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना औषधे आणि घरचे जेवण मिळावे अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना संबंधित औषधं उपलब्ध करुन देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.आता संजय राऊतांचा जामिनीसाठी अर्ज करण्याचा पर्याय खुला झाला आहे.