महिलांना मोठा दिलासा : गर्भाशयाचा कर्करोगाविरुद्ध आली पहिली स्वदेशी लस
कोविड नंतर सीरमकडून Cervical Cancer पहिली स्वदेशी लस
मुंबई,३१ ऑगस्ट २०२२ – महिलांसाठी मोठा दिलासादायक बातमी समोर आली असून भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट कडून कोविड नंतर Cervical Cancer पहिली स्वदेशी लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग १ सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिली स्वदेशी विकसित क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (qHPV) ही लस १ सप्टेंबर रोजी येणार आहे.
कोव्हिड लस तयार करणाऱ्या सीरम कंपनीने मोठी घोषणा केली आहे. सीरम संस्थेनं पहिली स्वदेशी Cervical Cancer वर लस आणली आहे. त्यामुळे आता अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्भाशयाचा कर्करोगाविरुद्ध पहिली स्वदेशी लस आणण्यात भारताला मोठं यश मिळालं आहे.
ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्वात जास्त महिलांना होणारा दुसरा कॅन्सर म्हणजे Cervical Cancer आहे. अंदाजानुसार, भारतात दरवर्षी एक लाख २३ हजारांहून अधिक महिलांना हा आजार होतो. ७७ हजारांहून अधिक महिलांचा मृत्यू होतो. सध्या देशभरात सुमारे पाच टक्के महिला या आजाराने त्रस्त आहेत.
ही लस १४ वर्षांच्या मुलींना दिली जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस फक्त मुलींना दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. हि लस स्वदेशी असल्याने खिशाला परवडणारी असेल अशी चर्चा आहे. मात्र अद्याप याचं मूल्य किती असेल हे समोर आलं नाही.
काय आहे हा आजार?
गर्भाशयात कर्करोग होतो. गर्भाशयात असलेल्या अस्तराच्या पेशी मोठ्या प्रमाणात वाढत जातात. कधीकधी पाळीत अनियमितता किंवा एकापेक्षा जास्त तरुणांशी संबंध ठेवल्याने देखील हा आजार होण्याचा धोका असतो असं सांगितलं जातं.हा आजार झालाय याची लक्षणं सुरुवातीला पटकन कळत नाहीत. त्यामुळे काही लक्षणं दिसताच तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मासिक पाळीत अनियमितता, मासिक पाळीव्यतिरिक्त रक्तस्त्राव, सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव, दुर्गंधीयुक्त स्त्राव इत्यादी गर्भाशयाच्या कॅन्सरची प्रमुख लक्षणं आहेत.
India's first vaccine against cervical cancer to come out tomorrow
Read @ANI Story | https://t.co/afDsxGBqpF#cervicalcancer #firstvaccine pic.twitter.com/xjxsdAj5BE
— ANI Digital (@ani_digital) August 31, 2022