नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट:काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबेची माघार 

सत्यजीत तांबे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार ? 

0

नाशिक,१२ जानेवारी २०२३ – नाशिकमधील पदवीधर मतदार संघात शेवटच्या काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या आहे. या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतांना डॉ.सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाच नाही. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.काँग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पक्षाकडून अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

नाशिकमध्ये सलग तीन वेळा पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या सुधीर तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करून त्यांनी मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीतून माघार घेतली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असतांना सुधीर तांबे म्हणाले, कॉंग्रेस पक्षाकडून मी तीन वेळा मी निवडून आलो आहे, विधान परिषदेसाठी हा वेगळा मतदारसंघ आहे. शिक्षक, पदवीधर, डॉक्टर यांचे प्रतिनिधित्व मी केलं पेन्शन, शिक्षक आणि डॉक्टर यांचे प्रश्न मी कायम हाताळले, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. सत्यजित तांबे यांना कॉंग्रेस कडून एबी फॉर्म मिळाला नाही पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.युवा नेतृत्व आहे, तरुणांना संधी देण्याचे कॉंग्रेसने नेहमीच केले आहे. त्यामुळे माझ्या ऐवजी सत्यजित तांबे हे उमेदवार असतील. भाजपकडून मला ऑफर नव्हती असे हि तांबे आणि माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

मी काँग्रेसचाच उमेदवार- सत्यजीत तांबे
सत्यजीत तांबे यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. माध्यमांशी बोलताना, सत्यजीत तांबे यांनी म्हटले की, काही कारणास्तव माझ्या नावाने असलेला ए बी फॉर्म वेळेत आला नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी  अर्ज दाखल केला असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेस पक्षासाठी सोडली होती. त्यामुळे उमेदवार कोणता असावा हे काँग्रेसने ठरवायचे होते असेही त्यांनी म्हटले.

काँग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पक्षाकडून अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे सुधीर तांबे यांनी पक्षशिस्तीचा भंग केला का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पक्षाच्या नेतृत्वासोबत चर्चा करण्यात आली होती, असे सुधीर तांबे यांनी म्हटले. वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर सत्यजीत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सुधीर तांबे यांनी म्हटले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!